येऊ कशी तशी मी नांदायला मधील स्वीटुने बघा काय केले

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही झी मराठीवर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. रोजच्या जीवनात आपल्याला सगळीकडे सासू सुनेची भांडण पाहायला मिळतात ज्यामुळे घरात नेहमी अशांतता असते. परंतु या मालिकेत आपल्याला सासू सुनेच गोड नातं पाहायला मिळणार आहे.
आज आपण या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील स्वीटू बद्दल माहिती घेणार आहोत.

स्वीटुची आणि ओंकारची जोडी प्रेक्षकांना आवडत आहे. स्वीटु हे या मालिकेतील प्रमुख पात्र अभिनेत्री अन्वीता फलटणकर ने साकारली आहे. अन्वीताचा जन्म ठाण्यातला आहे. अनिकेत हे तिच्या भावाचे तर बहिणीचे नाव आर्या फलटणकर आहे. तिचे शालेय शिक्षण सरस्वती सेकंडरी स्कूल मध्ये झाले आहे. तिने रूपारेल कॉलेजमधून आर्टसची पदवी घेतली आहे.

अन्वीताला लहानपणापासूनच अभिनय आणि शिक्षणाची आवड आहे. लहान असताना तिने बऱ्याच अभिनय स्पर्धेत भाग घेतला आहे. तिला नृत्याचीही खूप आवड आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमात तिने नृत्य स्पर्धेत भाग घेतला आहे आणि बक्षिसेही मिळवली आहेत. आत्तापर्यंत तिने ‘गर्ल्स, टाईमपास, आता नुसता राडा’ यांसारख्या मराठी चित्रपटात काम केले आहे.

‘व्हाय सो गंभीर’ या नाटकातही तिने काम केले आहे. तसेच सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता. अन्वीता सध्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत स्वीटूची भूमिका साकारत आहे. ही तिची पहिलीच मालिका आहे ज्यात तिला प्रमुख भूमिका साकारायला मिळाली आहे. तुम्हालाही ही स्वीटु कशी वाटते आम्हाला नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *