Breaking News
Home / कलाकार / जिजी आक्का पहा कशी दिसते

जिजी आक्का पहा कशी दिसते

आज आपण इथे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत अभिनय करणाऱ्या खूप प्रसिद्ध अशा कलाकाराबद्दल बोलणार आहोत. ही अभिनेत्री सध्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत अभिनय करत आहे. या मालिकेत त्यांचे नाव जिजीआक्का असे आहे. या जिजीआक्काचे खरे नाव आदिती देशपांडे आहे.

अदिती देशपांडे यांच्या जन्म मुंबईतच झाला आहे आणि त्या मुंबईतच स्थायिक आहेत. त्यांचे पदवीचे शिक्षणही मुंबई मधूनच पूर्ण झाले आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने त्यांनी आधी नाटकात काम करायला चालू केले. ‘दुर्गा झाली ओ, झुलवा’ ही त्यांची सुरुवातीला केलेली नाटक आहेत. १९९६ मध्ये ‘करामती’ या मालिकेपासून त्यांनी त्यांच्या खऱ्या टीव्हीवरील अभिनयाला सुरुवात केली.

त्यानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिका केल्या. ‘मै मायके चली जाऊंगी तुम देखते रहीयो, रिशता लिखेंगे हम नया’ यामुळे त्या जास्त ओळखली जाऊ लागल्या. ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या चित्रपटासाठी त्यांना नॅशनल फिल्म अवार्ड भेटला होता. त्यानंतर आदिती यांनी ‘पक पक पकाक, माय बाप, वजनदार, जोगवा’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हे चित्रपट बरेच हिट सुद्धा झाले. आदितीला ३ वेळा नॅशनल अवॉर्ड भेटला आहे. त्यांच्या नवऱ्याचे नाव निनाद देशपांडे आहे. निनाद सुद्धा एक अभिनेता आहे. आदिती आणि निनाद यांना मिहीर हा एक मुलगा आहे. सुलभा देशपांडे ज्या खूप सुप्रसिद्ध अशा अभिनेत्री होत्या. आदिती या सुलभाताई यांच्या सून आहेत. सुलभाताईंचं चार वर्षांपूर्वी निधन झाले.

आदिती या खूप मनमिळाऊ स्वभावाच्या आहेत असे त्यांचे जवळचे नातेवाईक सांगतात. सध्या आदिती ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत जिजीआक्काची भूमिका साकारत आहेत, जी सर्वांना खूपच आवडत आहे. ही मालिका आता घरोघरी पाहिली जाते. तुम्हाला आदिती देशपांडे बद्दल काय वाटते, कंमेन्ट मध्ये नक्की कळवा.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *