Breaking News
Home / कलाकार / अभिमन्यूची खऱ्या आयुष्यातली लतिका पहा किती क्युट आहे

अभिमन्यूची खऱ्या आयुष्यातली लतिका पहा किती क्युट आहे

छोट्या पडद्यावरील बऱ्याच मालिका आता दर्शकांना प्रभावित करत आहेत. बरेच कलाकार एकत्र येऊन आपल्यासाठी नवीन नवीन मालिका प्रस्तुत करत असतात. त्यांच्या अभिनयाने आपले मन मोहून घेतात आणि आपण याच्या पुढे आता काय होणार हे पाहण्यासाठी नेहमीच आतुर असतो. अशीच एक नवीन आलेली मालिका दर्शकांच्या मनोरंजनासाठी आली आहे ती म्हणजे ‘सुंदरा मनामध्ये भरली’.

यामध्ये अभिमन्यू नावाच्या मुलाला जाड मुलीशी लग्न करायचे नसते. त्याला स्लिम मुलगी पाहिजे होती. पण आता या मालिकेमध्ये पुढे काय होते हे आपल्याला रोज ही मालिका पाहिल्यावर कळेलच. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये आपल्याला पुन्हा एकदा आपला आवडता अभिनेता समीर परांजपे लतिका सोबत येत आहे.

अभिमन्यू आणि लतिका या दोघांची जोडी आणि त्याच्यामध्ये सध्या काय चालू आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. या मालिकेच्या आधी समीर परांजपे हा ‘गोठ’ या मालिकेत अभिनेत्री रुपल नंद बरोबर आपल्याला दिसला होता. त्याही जोडीस दर्शकांनी पसंती दिली. परंतु समीर परांजपेच्या खऱ्या आयुष्यातील लतिका कोण आहे, खऱ्या आयुष्यातील समीरची बायको ही सुद्धा जाड आहे का हे आता आपण पाहूया.

समीरचे आधीच लग्न झालेले आहे. समीरने अनुजाबरोबर प्रेमविवाह केला आहे. या दोघांची मैत्री ही त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणापासून आहे. त्या दोघांनी लग्नापूर्वी 3 वर्षे एकमेकांना डेट केले आहे. त्यानंतर दोघांनी लग्नाच्या बंधनात अडकायचे ठरवले. बऱ्याच नातेवाईक आणि इतर व्यक्तींच्या समवेत २७ नोव्हेंबर २०१६ ला समीर आणि अनुजाचे लग्न झाले.

या दोघांच्या आयुष्यात सध्या आनंद आहे कारण जेव्हा एखाद्याला आपल्या आवडीची व्यक्ती आपल्या सोबत आहे यापेक्षा अजून जास्त एखाद्या व्यक्तीला काय पाहिजे. दोघांच्याही लग्नाला आता चार वर्षे पूर्ण होतील. समीर आणि अनुजा यांच्या या नात्याला आता अकराहूनही अधिक वर्षे झाली आहेत. आपणही या दोघांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभकामना देऊयात आणि दोघेही असेच आनंदात राहावे ही सदिच्छा.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *