हे फायदे पाहून बाजरीची भाकर तुम्ही नक्की खाल

१) पित्त : पोटात काही कारणाने ऍसिडचे प्रमाण जास्त झाल्याने ऍसिडिटी म्हणजेच पित्ताचा त्रास होतो. पोटात वेगवेगळ्या कारणांमुळे acid चे प्रमाण वाढू शकते जसे की वेळेत जेवण न करणे, पित्तकारक पदार्थ जास्त प्रमाणात खाणे. बाजरी ही पित्त शमवण्यासाठी उपयुक्त असते कारण तिच्यात अल्कली गुणधर्म असतात. म्हणूनच पित्ताचा त्रास होत असल्याच बाजरीची भाकरी किंवा खिचडी खाल्ल्याने त्वरित आराम मिळतो.

२) अँटिऑक्सिडंट्स चे प्रमाण : अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील पेशींचे फ्री रॅडिकल्स या द्रव्यापासून रक्षण करत असतात. निरोगी राहण्यासाठी आहारात जास्तीतजास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्सचा समावेश केला पाहिजे. यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते. बाजरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात त्यामुळे तिचा समावेश आपल्या आहारात केला तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले असते. थंडीच्या दिवसात आपल्याला सर्दी, खोकला यासारखे आजार पटकन होतात त्यामुळे विशेषतः थंडीच्या दिवसात बाजरीचे पदार्थ खाल्ले तर ते चांगले असते.

३) आपल्या रक्तात दोन प्रकारच्या पेशी असतात, पांढऱ्या रक्तपेशी आणि तांबड्या रक्तपेशी. या पैकी पांढऱ्या रक्तपेशी या विविध आजारांपासून आपले संरक्षण करण्यात कार्यरत असतात. तांबड्या रक्तपेशी या हिमोग्लोबिनच्या मदतीने आपले शरीरातील इतर पेशींना प्राणवायूचा पुरवठा करत असतात. पण काही कारणाने जर या रक्तपेशींची संख्या कमी झाली तर हिमोग्लोबिनची सुद्धा कमरता होते. यालाच ऍनेमिया म्हणतात. यामुळे थकवा जाणवू लागतो. आहारात तर आयर्न या खनिजाचे प्रमाण वाढवले तर रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते.

४) बाजरीमध्ये फॉस्फरस हे खनिज अधिक प्रमाणात आढळते. हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम बरोबर फॉस्फरस सुद्धा गरजेचे असते. ही दोन्ही खनिजे मिळून हाडांना बळकट करतात. त्यामुळे आहारातून जास्तीतजास्त प्रमाणात काल्शियम आणि फॉस्फरस घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. बाजरीचे पदार्थ खाण्याचा हा एक महत्वाचा फायदा आहे.

५) त्वचेसाठी फायदेशीर : बाजरीमध्ये खनिजे जास्त प्रमाणात आढळतात. बाजरीमध्ये असेच एक महत्वाचे खनिज, जे जास्त प्रमाणात असते ते म्हणजे झिंक. झिंक हे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते. झिंकमुळे त्वचा टवटवीत दिसते तसेच त्वचेच्या तक्रारी जसे की पिंपल्स सुद्धा दूर होतात. म्हातारपणामुळे चेहऱ्याला येणाऱ्या सुरकुत्या सुद्धा शरीरात झिंक योग्य प्रमाणात असेल तर कमी होतात. निरोगी आणि टवटवीत त्वचा असेल तर नियमितपणे बाजरीचे सेवन अतिशय लाभदायक असते.

६) बाजरीच्या नियमित सेवनाने शरीरात व्हिटामिन ए तयार होण्यासाठी मदत होते. व्हिटामिन ‘ए’ डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी असते. यामुळे डोळ्यांचे विकार दूर होतात. रातांधळेपणाचा त्रास सुद्धा व्हिटामिन ‘ए’ चे प्रमाण योग्य असेल तर कमी होतो. बाजरीचा एवढासा दाणा असतो पण किती बहुगुणी असतो, हे हा लेख वाचल्यावर तुमच्या लक्षात आले असेल. या नंतर तुम्ही सुद्धा तुमच्या आहारात जास्तीतजास्त प्रमाणात बाजरीचा समावेश करालच, हो न?

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *