स्वामींचा दादर मध्ये चमत्कार पाहून तुम्ही पण म्हणाल श्री स्वामी समर्थ

मुंब’ईत राहणा’ऱ्यांना किंवा मुंबईची ओळख असलेल्या कोणत्याही व्यक्तीला दादर येथील सिद्धिविनायक मंदिर माहिती नाही, असे होणारच नाही. मुंबईत फिरण्यासाठी, पर्यटनासाठी किंवा अगदी का’मासाठी येणाऱ्या व्यक्ती प्रभादेवीच्या सिद्धि’विनायकाचे दर्शन वेळात वेळ काढून घेतात. या प्रसिद्ध अशा सिद्धि’विनायक मंदिराला एक वेगळी अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे.

ब्रह्मांडनायक असलेल्या स्वामी समर्थ महाराजांची आणि मुंबईतील श्रीसिद्धिविनायकाची एक कथा सांगितली जाते. मुंब’ईपासून इतक्या लांब अंतरावर असलेल्या अक्कलकोटमध्ये राहणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांचा नेमका कोणता योग जुळून आला? नेमकी घटना आणि स्वामी समर्थांची लीला कोणती? जाणून घ्या…

अक्कलकोट स्वा’मी आणि श्री रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात अन्य भक्तांपेक्षा अतिशय भिन्न नाते होते. एखादे ले’करू जसे आपल्या आईला सर्व काही सांगते. तिच्यावर प्रे’म करते, तिच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवते. अगदी तसेच नाते स्वामी समर्थ आणि जांभेकर महाराजांचे होते. असेच एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक, रामकृष्णा, तुला काय हवे?अशी विचारणा स्वामींनी केली.

प्रत्यक्ष ब्रह्मांड आपल्या हातात गोटीसमान धारण करणारे पर’ब्रह्म देण्यासाठी समोर असताना जांभेकर महा’राजांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही. ते स्वामींना म्हणाले की, स्वामी मला काही नको. तुम्हाला काही द्यायचे असल्यास माझ्या सिद्धिविनायकाला आपण वैभव द्या.

स्वामी समर्थ महा’राजांची शिकवण: श्रद्धा जरूर ठेवा, अंधश्रद्धा नको,रामकृ’ष्णबुवांची इच्छा ऐकून स्वामींना फार आनंद झाला. आपल्या लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काही न मागता ईश्वरासाठी मागितले. ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठि’काणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभवसंपन्न ईश्वरच आपल्या भ’क्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत साथ देत राहील. एका इच्छेत दोन गोष्टी साध्य होणार होत्या. ही कल्पना स्वामींना अतिशय आवडली.

स्वा’मींनी रामकृष्णबुवांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले की, तुझ्यासारखा शिष्य मला ला’भला हे माझे भाग्य आहे. मुंबईला गेल्यावर मंगळवारी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा. तिथे तू मंदार वृक्षाचे रोप’टे लाव. तुझा हा मंदार इंचाइंचाने वाढेल, तसे तसा तुझा सि’द्धिविनायक वाढेल. ज्या दिवशी तो मंदार बहरेल, त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल. स्वामींनी अतिशय प्रसन्न मनाने शुभाशिर्वाद दिले.

स्वामी समर्थ शिकवण: अहं’कार प्रगतीस बाधक; निरपेक्ष भक्ती श्रेष्ठ चौथ्या दि’वशी राम’कृष्णबुवा प्रभादेवीला आले. प्रथम त्यांनी मंगळवारी मंदाराचे रोपटे सिद्धिविनायक देवळात लावले आणि त्या ठिकाणी हात जोडून उभे राहिले. स्वामी मी माझे काम केले. आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा, अशी प्रार्थना त्यांनी केली.

हात जोडून म्हणाले की, हे गजानना, स्वामींनी दिलेला शब्द खरा ठ’रो आणि तुला या जगात वैभव प्राप्त होवो. या वैभवा’च्या झगमगाटाने तुझ्याकडे भक्त आकर्षित होवोत व त्या सर्व भ’क्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, असे आशीर्वचन रामकृष्णबुवांनी सिद्धिविनायकाकडे मागितले. स्वामी समर्थ महाराजांचा उपदेशः सद्गुरुशी नेहमी एकनिष्ठ असावे.स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला.

जांभेकर महाराजांनी सिद्धिविनायकासाठी मागितलेले वै’भव सिद्धिविनायकाला प्राप्त झाले. त्यांनी लावलेला मंदार वृक्ष जसा जसा बहरत गेला तसे सिद्धिविनायकाला वैभव प्राप्त झाली आणि त्याची कीर्ती स’र्वत्र पसरली. स्वामींनी आपल्या लाडक्या भक्ताची पूर्ण केली. स्वामी आशीर्वा’दाने मंदिर प्रासादिक झाले व भक्त कामकल्पद्रुम झाले हे मानण्यास हरकत नाही, अशी एक कथा सांगितली जाते.

पहा व्हिडीओ:

https://youtu.be/PmFVhNS2Z8k

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *