सलमानची हि हिरोइन दिसणार बिग बॉसच्या घरात

बिग बॉस हा सर्वात प्रसिद्ध आणि जास्त प्रमाणात बघितला जाणारा टीव्ही शो आहे. काही लोक सलमान फॅन असल्यामुळे बघतात तर काहींना तो शो खरंच बघू वाटतो म्हणून बघतात. शो चालू होण्याच्या आधीच दरवर्षी बऱ्याच गोष्टी बाहेर येतात आणि त्यावर चर्चा चालू असते. बिग बॉस अजून चालुही झाले नाही तोवर यामध्ये झालेले बदल ऐकायला मिळत आहेत.

ऐकण्यात आले आहे की, साथ निभाना साथिया या मालिकेमधली गोपीची भूमिका साकारणाऱ्या जिया माणेक ही बिग बॉसच्या येणाऱ्या सिजनमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच साथ निभाना साथिया या मालिकेचा ‘रसोडे मे कौन था’ हा व्हिडीओ खूप प्रसिद्ध झाला. परंतु तिच्या एका निर्णयामुळे तिचे करिअर खराब झाले.

जियाने साथ निभाना साथिया या टीव्ही मालिकेपासून सुरुवात केली. ती २०१० पासून या मालिकेमध्ये आहे. या मालिकेमुळे त्यांना काम, नाव, संपत्ती सगळं मिळालं आहे. थोड्या दिवसांतच ती सुपरस्टार बनली. २०१२ मध्ये जियाने डान्स शो झलक दिखला जा मध्ये भाग घ्यायचे ठरवले. ज्यावेळी साथ निभाना साथियाच्या निर्मात्याला ही बातमी समजली तेव्हा त्यांनी तिला त्यांच्या मालिकेमधून बाहेर केले.

जियानंतर ती भूमिका देवोलीना भट्टाचार्यला दिली. देवोलीनाने सुद्धा बिग बॉसमध्ये भाग घेतला होता. जेव्हा जिया त्या मालिकेमधून बाहेर आली तेव्हा तिचे सगळे करिअर खराब झाले आहे. ती झलक दिखला जाची ना विनर झाली ना नंतर तिला मालिकामध्ये प्रमुख भूमिका मिळाला. जिया आता बिग बॉस १४ मध्ये येण्यासाठी खूप उत्सुक आहे. जियाने बालिका वधू, जिनी और जूजू, बड़ी दूर से आए हैं, मनमोहिनी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *