शालिनीची बहीण लावणार आग ८ वर्षाने करणार

सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या उत्तम अभिनय करतात. बऱ्याच अभिनेत्री या काही कारणांमुळे अभिनयापासून थोडे दिवस ब्रेक घेतात आणि नंतर पुन्हा अभिनय करायला चालू करतात किंवा काही करतही नाहीत. आपण आज अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत. ही अभिनेत्री ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ या मालिकेत काम करणाऱ्या शालिनी म्हणजेच माधवी नेमकर हिची बहीण आहे.

माधवीची बहिणही एक अभिनेत्री आहे. तिच्या बहिणीचे नाव आहे सोनाली खरे. सोनाली खरे हि तब्बल आठ वर्षे सिनेसृष्टीपासून लांब राहिली. परंतु आता ती पुन्हा अभिनय करण्यास आणि दर्शकांची मने जिंकण्यास तयार आहे. सोनालीचा जन्म ५ डिसेंबर १९८२ ला झाला आहे. तिचे बिजय आनंद बरोबर लग्न झाले आहे आणि तो सुद्धा मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत अभिनेता म्हणून काम करतो.

ती सध्या तिच्या नवऱ्याबरोबर आणि मुलगी शनाया बरोबर मुंबईमध्ये राहत आहे. सोनाली खरे या २०१४ मध्ये ‘बे दुणे दहा’ या मालिकेमध्ये अभिनय करताना शेवटच्या दिसल्या होत्या. रोशन व्हीला, हृदयांतर, चेकमेट, तेरे लिये या अशा हिंदी आणि मराठी चित्रपटात सुद्धा सोनालीने काम केले होते. सोनाली आता टेलिव्हिजन वर पुन्हा दिसणार आहे आणि तेही एका कूकिंग शोमधून.

या कूकिंग शोचे नाव आहे ‘आज काय स्पेशल’. या ‘आज काय स्पेशल’ च्या कूकिंग शोचे सोनाली सूत्रसंचालन करणार आहे. हा शो २४ ऑक्टोबरपासून शनिवारी आणि रविवारी प्रसारित व्हायला चालू झाला आहे. त्यामुळे तुम्हीही आता या लॉकडाउन मध्ये तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर हा शो नक्की बघा ज्यामुळे तुम्हाला अजून नवनवीन पदार्थ कसे बनवायचे याची माहिती मिळेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *