शंभूराजे ची मुलगी भवानी बाई यांचा मृ त्यू कसा झाला

छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांची कन्या आहे हे खूप कमी जणांना माहीत आहे. या दोघांच्या कन्येचे नाव आहे भवानीबाई. भवानीबाई यांचा इतिहास अतिशय दुर्मिळ आहे. इसवी सन १६८९ मध्ये जेव्हा संभाजींचा मृ त्यू झाला त्यानंतर भवानीबाईंचे काय झाले, त्यांचा मृ त्यू कसा झाला याचा इतिहास आपण इथे पाहूया.

भवानीबाईंचा जन्म ४ सप्टेंबर १६७८ रोजी बिलाजी शिर्के यांच्या शृंगारपुरी येथील वाड्यात झाला. भवानीबाईंच्या जन्मामुळे येसूबाई आई झाल्या. शंभूराजे आबासाहेब झाले. भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवरायांची नात आणि संभाजी महाराज व येसूबाई यांची ज्येष्ठ कन्या आहेत. भवानीबाईंचे लग्न महाडिक कुटुंबात हर्जेराजे महाडिक आणि अंबिका बाई यांच्या पुत्राशी म्हणजेच शंकरराजेशी झाला.

अंबिका या छत्रपती शिवराय आणि सईबाई राणीसाहेब यांच्या धाकट्या कन्या आहेत. या दोघांच्या लग्नामुळे भोसले आणि महाडिक कुटुंबात पुन्हा एकदा सोयरीक जुळून आली. महाड बंधाराची वतन आणि देशमुखी खेडबंदराची मुकादमी प्राप्त झाल्यामुळे त्यांचे नाव महाडिक पडले होते. शहाजीराजांच्या स्वराजाच्या कामात परसोजी महाडिक यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली.

तेव्हापासून या घराण्याचा शिवशाहीशी संबंध आला. परसोजी महाडिक यांच्या सात मुलांपैकी हर्जेराजे महाडिक यांच्याबरोबर अनामिक उर्फ अंबिकाबाई यांचा विवाह करून छत्रपती शिवरायांनी महाडिक घराण्याशी सोयरीक केली. नाईक, निंबाळकर, जाधव, मोहिते या लोकांशी भोसलेंनी सोयरीक जोडली. महाराणी येसूबाई आणि शाहूराजे मोघलांच्या कैदेत असताना भवानीबाईंचे पती शंकरराजेंनी त्यांना सोडवण्याचा खूप प्रयत्न केला.

शंभूराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यावर औरंगजेब आणि मुघलांचा दक्षिणेवर डोळा होता. शाहू महाराज यांचा आपली ज्येष्ठ बहीण भवानी बाई यांच्यावर खूप जीव होता. शाहूंनी शंकरराजे याना सनद म्हणून दिलेल्या सातारा जिल्ह्यातील तारळे गावात भवानी बाई आणि ते राहायला गेले. मुघलांच्या धुमकुळामुळे तारळे गावाची हालाखीची परिस्थिती होती.

परंतु भवानीबाईंनी हे सर्व सांभाळले आणि तिथला कारभार सुरळीत चालू केला. काही दिवसांनी शंकरराजे मरण पावले त्यामुळे भवानीबाईंना सती जावे लागले. तारळे गावातील महाडीकांच्या खाजगी स्मशानभूमीत तारळे आणि काळगंगा या नद्यांच्या संगमावरती भवानीबाईंची समाधी आहे. भवानीबाई यांना दुरगोजी आणि अंबोजी असे दोन पुत्र होते. आजही राजे महाडिक यांचे आठही वाडे दिमाखात उभे आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *