या मुलीने घर सोडलं आणि ट्युशन शिकवून बनली ऑफिसर

आज मुली या मुलांच्या बरोबरीने सगळ्या गोष्टी करतात. घरात मुलीचा जन्म झाला असेल तर तिला मुलासारखी वागणूक दिली जाते तर कुठे अजूनही मुलींना कमीच समजले जाते. उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे राहणाऱ्या मुलीने असच काही आश्चर्य वाटेल असे केले आहे, जे तुम्ही दुसऱ्यांना एक उदाहरण म्हणून नक्की सांगू शकता.

संजू नावाच्या मुलीने तिच्या शिक्षणाला तिच्या करिअरला जास्त महत्त्व दिले आणि घरच्यांना सांगितले की ती लवकर लग्न करू इच्छित नाही. परंतु घरून लग्नाचा दबाव तिच्यावर होताच. त्यामुळे तिने घर सोडून जायचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय एवढा सोप्पा नव्हता. घर सोडल्यानंतर तिने २०१७ मध्ये सिव्हिल सर्विसेसची तयारी चालू केली.

७ वर्षांच्या तिच्या मेहनतीला फळ आले आणि ती पीसीएस परीक्षा पास होऊन चांगल्या पदावर रुजू झाली. २०१३ ला तिने घर सोडले होते. तिच्या घरी मुलीच्या शिक्षणाला एवढे महत्त्व दिले जात नाही. तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न सुद्धा खूप लवकर झाले होते. परंतु संजूला पुढे शिकायचे होते अन घरच्यांनी तिला साफ नकार दिला आणि लग्नाला दबाव टाकू लागले.

संजूला सहन न झाल्यामुळे तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. कसतरी तिने तीचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. घरी असताना तरीही तिला त्याच गोष्टीला सामोरे जावे लागत होते. स्वतःच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने वेळप्रसंगी शिकवण्या सुद्धा घेतल्या. जिथे भेटेल तिथे खाजगी नोकरी केली. परंतु तिने अभ्यासाकडे जरासुद्धा दुर्लक्ष केले नाही.

शेवटी तिच्या या कष्टाला फळ मिळाले. पीसीएस परीक्षा पास झालेली संजू आता आईएएसची तयारी करत आहे. तिचे स्वप्न आहे की ती मेरठची कलेक्टर व्हावी. तिची स्वप्न खूप मोठी आहेत पण तिला तिच्या घरच्यांनी साथ नाही दिली. आशा परिस्तिथीमध्ये सुद्धा तिने तिचे मन नाही खचू दिले. ती धाडसाने परिस्थितीला सामोरी गेली आणि तिची स्वप्न पूर्ण करत आहे. संजू ही मुलींसाठी एक खूप चांगले उदाहरण आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *