या मंदिरात अजून पण लोक जायला घाबरतात पहा कोठे आहे हे अनोखे मंदिर

भारतातील ह्या मंदिरात विराजमान असलेले देवीदेवतांचे दर्शन घेण्यासाठी फक्त देशातीलच नव्हे तर विदेशातून देखील भक्त येत असतात. त्याबरोबरच आपल्या इच्छेनुसार देवांपुढे साकडं घालत असतात. देशाच्या ह्या प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरात एक मंदिर असं पण आहे की, जेथे दर्शन करणं तर दूर ची गोष्ट तिथे आपले पाय पण ठेवायला भक्त भितात. “धर्मराज मंदिर” हे मृत्यू चे देवता असलेले यमराज यांना समर्पित आहे. भारत हा जगातील असा एकच देश आहे कि जिथे धर्म आणि अध्यात्म याचा संगम पाहायला मिळतो. इथे हिंदू धर्मातील देवी-देवतांचे मोजता देखील येणार नाहीत इतकी प्राचीन मंदिरे आहेत आणि ह्या सर्व मंदिरासोबत जडलेली काही न काहीतरी ऐतिहासिक मान्यता प्रचलित आहे.

धर्मराज मंदिर हे दिसायला एका घरासारखं दिसत. तिथे येणारे लोकं ‘धर्मराज मंदिर’ च्या आतमध्ये प्रवाह करायला भितात आणि बाहेरूनच प्रार्थना करून निघून जातात. “धर्मराज मंदिर” हे हिमाचल प्रदेशच्या चम्बा च्या जवळ एक छोट्याश्या कसबे भरमोर या गावात आहे. “मंदिर धर्मराज” म्हणजे मृत्यू चे देवता यमराज ला समर्पित आहे. मान्यतेनुसार असं बोललं जातं की ह्या मंदिर च्या जवळ एक कक्ष बनलेला आहे की जो चित्रगुप्त साठी आहे. जेव्हा पण कोणाचा मृत्यू होतो तेव्हा यमराजचे दूत सर्वात पहिले त्या व्यक्ती ची आत्मा ह्या मंदिरमधल्या चित्रगुप्तच्या समोर ठेवतात.चित्रगुप्त येथे येणाऱ्या आत्मा ला त्यांच्या कर्माचे पूर्ण ज्ञान देतात आणि नंतर चित्रगुप्त च्या समोरच्या कक्षामध्ये त्या आत्म्यास आणलं जात ज्याला यमराज च न्यायालय म्हणतात. लोकांच्या म्हणण्यानुसार ह्या मंदिरात चार अदृश्य दरवाजे आहेत जे सुवर्ण, रजत, तांबे आणि लोखंडपासून बनवलेले आहेत. यमराज च्या न्यायालयात आणल्या जाणाऱ्या आत्म्याचा जेव्हा निर्णय येतो तेव्हा त्यांचे दूत आत्मना कार्याप्रमाणे ह्याच दरवाज्यातून स्वर्ग किंवा नरक मध्ये नेले जाते. जर जिवंत माणूस ह्या मंदिरामध्ये जायला भितात परंतु मरणानंतर माणसाच्या आत्माला सगळ्यात पाहिले यमराज च्या ह्या मंदिरात हजेरी लावावी लागते आणि येथेच यमराज त्यांच्या कर्मानुसार त्यांना स्वर्ग किंवा नरक यामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *