या अभिनेत्रीने नुकतंच केलं लग्न फोटो होत आहेत वाय रल

गौहर खान ही या दिवसांत खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिचे जैद दरबार बरोबरचे प्रेमप्रकरण खूप प्रसिद्ध झाले होते. तिच्या बॉयफ्रेंडचे नाव जैद दरबार आहे जो प्रसिद्ध संगीतकार इस्माईल दरबारचा मुलगा आहे. गौहर आणि जैद दोघांची ओळख टिकटॉक व्हिडिओ बनवताना झाली होती. त्यानंतर दोघेही चांगले मित्रमैत्रिणी बनले आणि हीच त्यांच्या प्रेमाची सुरुवात होती.

या मैत्रीचे रूपांतर काही दिवसांनी प्रेमात झाले. याआधी सोशल मीडियावर दोघांनीही एकमेकांनाचे फोटो शेअर केले आहेत आणि दोघे मिळून डान्सचे व्हिडीओ सुद्धा टाकत होते. लॉकडाउनच्या काळात यांची मैत्री जास्तच घट्ट झाली. नेहा कक्करच्या ‘डायमंड दा छल्ला’ या गाण्यावरही दोघांचा डान्स बराच प्रसिद्ध झाला. याच व्हिडीओ मध्ये जैदने गौहरला अंगठी घातली आणि यामुळेच व्हिडीओ जास्तच पसरला.

या दोघांची खूप चर्चा होऊ लागली. आजकाल कोणीही लग्न करताना वयाचा विचार नाही करत. गौहर ही जैद पेक्षा ९ वर्षांनी मोठी आहे. त्यांच्या घरच्यांनाही याचा काही फरक नाही पडला. इस्माईल यांनी तर दोघांनी लग्न केले तर आशीर्वाद देऊ, असे एक मुलाखतीत सांगितले होते. आता या दोघांचे २५ डिसेंबर २०२० ला लग्न झाले. मुंबईच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये लग्न मोठ्या धुमधडाक्यात झाले.

जैद आणि गौहर दोघेही लग्नाच्या प्रत्येक कर्यक्रमात अतिशय सुंदर दिसत होते. गौहरने लग्नामध्ये ‘छल्ला वल्ला’ या गाण्यावर आणि बाकी बऱ्याच गाण्यांवर डान्स सुद्धा केला. याच कार्यक्रमात आवेझ दरबारने नगमा मिरजकरला प्रोपोज केले. लग्नानंतर दोघांनीही एक आरामदायी आणि खर्चावाला हनीमून सुद्धा प्लॅन केला आहे, तोही १० दिवसांचा. दुबईच्या ‘अटलांटिस द पाल्म’ मध्ये राहायची व्यवस्था केली आहे.

जैदने एक गिफ्ट द्यायचेही प्लॅन केले आहे ते आपल्याला नंतर दिल्यावर समजलेच आणि तिकडे फिरण्यासाठी दोघांना एक कार सुद्धा बुक केली आहे. या दोघांचाही हनीमून कसा जातो हे आपल्याला नंतर त्यांच्या फोटोवरून समजलेच. दोघांची ही जोडी अतिशय सुंदर दिसते आणि या दोघांनाही लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. गौहर खानचा आमचा हा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद !!!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *