मोदीजी पडले पाय सटकून व्हिडीओ होत आहे वायरल

नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दीत जनतेसाठी बरीच कामे केली आहेत. काही लोक खुश आहेत तर काही लोक नाखूष पण त्यांनी केलेल्या राजकीय कामांमधील चांगला बदल हे कोणी दुर्लक्षित नाही करू शकत. मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० झाला. वडिलांचे नाव दामोदरदास मुळचंद मोदी आणि आईचे नाव हिराबेन मोदी आहे. जे वय मज्जामस्ती खेळण्याचे असते, त्या वयात त्यांनी स्वतःच्या घराची आर्थिक परिस्थिती सांभाळली आहे आणि त्यासाठी रेल्वेमध्ये चहा विकला आहे.

चहा विकत विकत त्यांनी अभ्यास सुद्धा केला आणि शिक्षण घेऊ लागले. १३ व्या वर्षी त्यांचा साखरपुडा यशोदाबेन चमनलाल केला आणि १७ व्या वर्षी लग्न करण्यात आले. पण हे लग्न जास्त काळ टिकले नाही आणि दोघे वेगळे झाले. मोदी यांना देशासाठी काहीतरी करायचे होते. १९६२ साली जेव्हा भारत चीन युद्ध झाले तेव्हा त्यांनी जवानांच्या रेल्वेमध्ये जेवण आणि चहा घेऊन जात होते. १९६५ मध्ये भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळीही मोदींनी जवानांची खूप सेवा केली होती.

ते नंतर आरएसएस चे प्रचारक झाले आणि बऱ्याच ठिकाणी जाऊन त्यांनी जनता कशी जगत आहे ते पाहिले. ‘संघर्षमा गुजरात’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या आरएसएस मधल्या चांगल्या कामगिरीमुळे भाजपामध्ये जागा मिळाली. १९९० मध्ये आडवणी यांच्या एक भव्य रथ यात्रेचे आयोजन केले होते. नंतर बराच काळ उलटल्यावर आणि काही कारणांमुळे केशुभाई पटेल यांच्या जागी नरेंद्र मोदी यांना २००१ ला गुजरातचे मुख्यमंत्री पद मिळाले. या काळात त्यांनी गुजरातचा खूप विकास केला.

त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना गुजरातमध्ये चार वेळा म्हणजेच २००१ ते २०१४ पर्यंतचे मुख्यमंत्रीपद मिळाले. नंतर ते प्रधानमंत्री बनले. आपल्या आयुष्यात कधी काय होईल कोणीही सांगू शकत नाही. आयुष्यातील गोष्टी कोणाच्याच नशिबापासून चुकल्या नाहीत मग तो गरीब असो किंवा श्रीमंत, राजा असो किंवा रंक. असाच एक किस्सा आपल्या नरेंद्र मोदी यांच्याबरोबर घडला आहे. ते एकदा चालत असताना त्यांचा तोल गेला आणि पायऱ्यांवरून घसरले.

आपणही लहानपणापासून बऱ्याचदा पडलो पण नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत त्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ खूप प्रसिद्ध होत आहे. चला तर मग आपण येथे त्या घटनेची कधी न कसे मोदीजी घसरले याची माहिती घेऊयात. कानपुर येथील गंगा घाट च्या पायऱ्यांवरुन चालताना मोदी यांचा पाय घसरला. त्यावेळी तेथे नमामी गंगे प्रोजेक्टच्या पाहणीसाठी दौऱ्यावर गेले होते. ते जरी पडले असले तरी ते लगेच उभे राहिले आणि चालू लागले. तसेच आपल्याही जीवनात आहे, कोणतीही गोष्ट किंवा कितीही अडथळे आपल्या आयुष्यात आले तरीही आपण पुन्हा उभे राहून त्यांना सामोरे जावे. नरेंद्र मोदी हे देशासाठी एक आदर्श आहेत.

पहा व्हिडीओ : https://www.youtube.com/watch?v=ReX23pC2meo

https://www.youtube.com/watch?v=ReX23pC2meo

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *