मृण्मयी चा नवरा पाहून तुम्ही कमेंट नक्की कराल

व्यक्तीच मन नेहमी प्रसन्न असेल तर ती व्यक्ती कोणतेही काम करण्यासाठी नेहमी उत्सुक असते. नेहमी उत्सुक, खोडकर पण अतिशय प्रेमळ आणि गोड स्वभावाच्या अभिनेत्रीबद्दल आपण इथे बोलणार आहोत. ही अभिनेत्री अभिनयाबरोबरच दिग्दर्शनही करते. या अभिनेत्रीने हिंदी, मराठी चित्रपटात आणि मालिकांमध्येही अभिनय केला आहे.

एक यशस्वी अभिनेत्री असणारी ही मृण्मयी देशपांडे. मृण्मयी ही मनाने खूप चांगली आणि हुशार सुद्धा आहे. तिचा जन्म २९ मे १९८८ ला पुण्यात झाला. तीचे बालपण, शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण सर्व काही पुण्यात झाले आहे. मृण्मयी ही सदाशिव पेठेतील राहणारी आहे म्हणजेच ती एक अस्सल पुणेरी मुलगी आहे. त्यामुळे तिचा स्वभाव असा का आहे हे तुम्हाला आता समजलेच असेल खरंतर पुण्यातील माणसांची ती ओळखच आहे.

मृण्मयीला अभिनयाबरोबरच नृत्याचीही आवड आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात २००८ मध्ये ‘हमने जीना सीख लिया’ या हिंदी चित्रपटापासून केली आहे. परंतु ती झी मराठीवरील ‘कुंकू’ या मालिकेमुळे जास्त प्रसिद्धीस आली. तसेच तिने ‘अग्निहोत्र’ या स्टार प्रवाहच्या मालिकेमध्येही काम केले. ती ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कलर्स मराठीच्या शोमध्ये अँकर म्हणून काम करते.

तिने ‘एक कप चहा, शिकारी, नटसम्राट, फर्झद, १५ ऑगस्ट’ यांसारखे अनेक चित्रपट केले आहेत. मृण्मयीचे लग्न स्वप्नील राव यांच्याबरोबर २०१६ मध्ये झाले. त्या दोघांची जोडी तुम्ही पाहिलीच असेल. त्या दोघांचेही स्वभावही खूप मिळते जुळते आहेत. ज्यावेळी स्वप्नील मृण्मयीला बघायला गेला होता त्यावेळी मृण्मयीला पाहताक्षणीच त्याला तिच्यावर प्रेम झाले होते.

तुम्ही त्यांच्या बऱ्याचशा मुलाखती सुद्धा पाहिल्या असतील ज्यात तुम्हाला समजून येईल की ते एकमेकांना किती प्रेम करतात. अतिशय छान अशी दोघांची जोडी आहे. स्वप्नीलने त्याचे शिक्षण परदेशात केले आहे त्यामुळे तो जास्तकरून इंग्लिश मध्ये बोलताना दिसतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *