मुलगी झाली हो मधील माऊ पहा कशी दिसते

मुलगी झाली हो’ ही नवीन आलेली मालिका आता दर्शकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेत एका नावडत्या आणि तरीही जन्माला आलेल्या मुलीची कहाणी आहे, जिचे नाव माऊ हे आहे. या मालिकेत माऊची भूमिका करणाऱ्या मुलीला बोलायला येत नसते. ती तिच्या मनातल्या भावना कोणाला बोलूनही दाखवू शकत नाही. तिचे वडील, आजी सुद्धा तिचा खूप तिरस्कार करत असतात म्हणून माऊ ला त्यांच्याबद्दल प्रेम नाही असं नाहीये.

तिलाही तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे. परंतु माऊ आणि तिची आई या शांतपणे काही पर्याय नसल्याने सहन करून घेतात. यामध्ये माऊ या छोट्या मुलीची भूमिका करणाऱ्या बालकलाकाराचे नाव मैथिली पटवर्धन आहे. आता ही माऊ मोठी झाली आहे जी प्रेक्षकांना बरीच पसंतीस येत आहे. तुम्हाला या मोठ्या माऊ बद्दल जाणून घ्यायची उत्सुकता लागली असेल तर पुढे नक्की वाचा.

मोठ्या माऊची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव दिव्या सुभाष पुगावकर आहे. दिव्याचा जन्म २६ जुलै १९९६ ला झाला. दिव्या ही मुंबईमध्ये स्थायिक आहे, परंतु तिचे मुळगाव माणगाव हे आहे. तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमधूनच पूर्ण झाले आहे. तिला अभिनयाबरोबरच मॉडेलिंगचीही खूप आवड आहे. मी मराठी या वाहिनीने आयोजित केलेल्या मुंबईच्या सुकन्या फॅशन शोची दिव्या विजेती आहे.

स्टार प्रवाहच्या ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मराठी मालिकेपासून टीव्हीवर काम करायला चालू केले. या मालिकेत तिची मुख्य भूमिका नसून तिने एक छोटी भूमिका साकारली होती. यानंतर स्टार प्रवाहच्या ‘विठू माऊली’ या मालिकेत दिव्याने चंद्रभागा ही भूमिका साकारली होती. आता दिव्या स्टार प्रवाहच्याच ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत दिसत आहे. तुम्हालाही तिची ही मुकेपणाची भूमिका कशी वाटत आहे कंमेन्ट मध्ये नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *