बिग बॉस १४ मधील आर्शी खान पहा

आज आपण येथे भारतीय अभिनेत्री तसेच डान्सर असलेल्या आर्शी खान बद्दल बोलणार आहोत. आर्शीचा जन्म २९ नोव्हेंबर १९८९ ला अफगाणिस्तान मध्ये झाला. मोहम्मद अरमान खान हे तिच्या वडिलांचे तर आईचे नाव नादिरा खान आहे. तिचे मुळगाव भोपाळ मध्यप्रदेश येथील आहे. आर्शीचे संपूर्ण शिक्षण भोपाळ मधूनच पूर्ण झाले आहे.

परंतु सध्या ती तिच्या कुटुंबाबरोबर मुंबई मध्ये स्थायिक झाली आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली. २०१४ मध्ये आर्शीने मॉडेलिंग मध्ये मिस ग्लोरी अर्थ ब्युटी कॉन्टेस्ट जिंकली होती. यानंतर २०१४ मध्येच ‘माली मिसटी’ या एका तामीळ चित्रपटापासून अभिनय करायला चालू केले. ‘द लास्ट एमपेरर’ या हिंदी चित्रपटापासून बॉलीवूड मध्ये काम करायला चालू केले.

तेही २०१४ या वर्षामध्येच. याबरोबर ती ‘बिग बॉस सीजन ११’, जो २०१७ मध्ये झाला त्यातही सहभागी होती. बिग बॉस मध्ये जाऊन आर्शीला खूप प्रसिद्धी मिळाली. ‘सावित्रीदेवी कॉलेज अँड हॉस्पिटल’ ही तिची २०१८ मध्ये प्रसारित झालेली पहिली टीव्ही मालिका आहे. आर्शीने पंजाबी व्हिडीओ मध्ये सुद्धा काम केले आहे.

आर्शी सध्या बिग बॉस १४ मध्ये एक चॅलेंजर म्हणून आली आहे. तिने घरात आल्यापासून खूप गोंधळ चालू केला आहे. विकास गुप्ताची तिने जाईपर्यंत पाठ सोडली नाही. जेव्हा बघेल तेव्हा विकास गुप्ताला तिने आपले लक्ष्य बनवले आहे. बातम्यांनुसार असे समजते की, आर्शीचे पाकिस्तान क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी बरोबर प्रेमप्रकरण चालू आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *