प्रियंकाशी लग्न करण्याआधी या मोठ्या हिरोईनींना फिरवलं आहे निक जोनास ने

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने निक जोनस बरोबर लग्न केले हे सगळ्यांना माहीत आहे. निकचा २८ वा वाढदिवस झाला. निकचा जन्म १६ सप्टेंबर १९९२ ला अमेरिकेच्या टेक्सासमध्ये झाला. निक जोनस हा एक प्रसिद्ध पॉप सिंगर आहे. परंतु आज आपण इथे त्याच्या करिअरबद्दल नाही तर त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्ही ऐकल्या असतील किंवा नसतीलही.

निक आणि प्रियांकाने २०१८ मध्ये लग्न केले आणि त्यांच्या लग्नाच्या आधीपासूनच ते एकमेकांना खूप वर्ष डेट करत होते. निकच्या आयुष्यात प्रियंकाच्या आधीही बऱ्याच मुली येऊन गेल्या आहेत. त्याचे प्रेम संबंध नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत. असे ऐकण्यात आले आहे की प्रियांकाच्या आधी त्याच्या आयुष्यात चार मुली होत्या.

माइली साइरस : निकला वयाच्या १४ व्या वर्षीच त्याच्या शाळेतल्या एका मुलीवर पहिले प्रेम झाले होते. माईली ही डिज्नी स्टारची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ही गोष्ट निकने स्वतः एका मुलाखतीत सांगितली आहे. त्याने माइलीला पहिल्यांदा किस केले तेव्हा ते हॉलीवुडमधल्या कैलिफोर्निया पिज्जा किचनच्या बाहेर होते. त्या दोघांचे हे नाते जवळपास एक वर्ष चालले.

सेलेना गोमेज :२००८ मध्ये निकच्या जीवनात अजून एक मुलगी आली जिचे नाव सेलेना गोमेज. सेलेना निकचा एक ‘Burnin Up’ या व्हिडीओ मध्ये होती. परंतु हे नाते एवढे नाही टिकले आणि दोघेही वेगळे झाले. डेल्टा गुडरेम : सेलेना गोमेजनंतर २०११ मध्ये निकला डेल्टा गुडरेम ही मुलगी भेटली. डेल्टा ही एक ऑस्ट्रेलियन गायक आहे. हे नातेही दहा महिने चालले आणि नंतर ब्रेकअप झाले. डेल्टा सुद्धा निकपेक्षा ८ वर्षांनी मोठी आहे.

ओलिविया कल्पो : ओलिविया ही एक प्रसिद्ध मॉडेल आहे. २०१३ मध्ये निकला तिच्यावर प्रेम झाले. हे नाते दोन वर्षे चालले नंतर त्यांनी २०१५ मध्ये वेगळं व्हायचा निर्णय घेतला. प्रियंका चोप्रा : ओलिविया पासून वेगळे झाल्यावर निकला प्रियंका चोप्रा भेटली. निकनेच प्रियंकाला ग्रीस मध्ये प्रोपोस केले होते आणि नंतर त्यांचे २०१८ मध्ये लग्नही झाले.

या दोघांचे लग्न त्यावेळी खूप चर्चेचा विषय ठरला होता. सगळीकडे बातम्यांमध्ये फक्त प्रियंका आणि निक हेच होते असे म्हणल तर वाईट नाही. दोघेही आता त्यांचे जीवन एकमेकांबरोबर सुखाने व्यतीत करत आहेत. प्रियंका ही निकपेक्षा १०वर्षांनी मोठी आहे परंतु दोघेही एक चांगले जीवन आणि एकमेकांना साथ देत आहेत. या दोघा जोडप्याचे प्रेम खूप ठिकाणी पाहिले गेले आहे. निक आणि प्रियंका हे जिथेही जातात तिथे नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *