प्रसाद ची बायको पहा, सेटवरच प्रसादने तिला

कोण कधी कोणाला भेटेल आणि प्रेमात पडेल हे सांगू शकत नाही. प्रेम एक सुंदर भावना आहे जी शब्दात व्यक्त करता येत नाही. प्रेमात असलेल्या व्यक्तींना एकमेकांच्या मनातले न सांगता कळते. असंच घडलं आहे प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांच्यामध्ये. प्रेमात पडल्यावर प्रत्येकाच्याच मनात त्याचे घर बनते. तो अनुभव त्या आठवणी कोणी विसरू शकत नाही. प्रसाद ओक यांनी एका ठिकाणी अभिनय करण्यासाठी शिबीर घेतले होते. त्या शिबिरात मंजिरी ओक या अभिनय शिकण्यासाठी गेलेली.

मंजिरी ही प्रसाद ओक यांच्या भावाच्या वर्गात होती आणि त्याच्या सांगण्यावरून मंजिरी त्या शिबिरामध्ये सहभागी झाली. हे शिबीर तब्बल ३ महिन्यांचे होते आणि या ३ महिन्यातच प्रसाद आणि मंजिरी यांच्यात जवळीक निर्माण झाली. शिबिरामध्ये दोन नाटके बसवण्यात आली होती पण त्या दोन्हीतही मंजिरीला कोणता रोल दिला नव्हता. मग यामुळे प्रसाद यांच्या दृष्टीकोन, अभिनय, बोलण्याची कला यांवर मंजिरीचे जरा जास्तच लक्ष गेले. थोड्या दिवसांनी खास तिच्यासाठी प्रसाद ओक यांनी एक नाटक बसवले.

या नाटकात फक्त ते दोघेच होते आणि त्या नाटकाचे नावही यांच्या प्रेमाला शोभेल असे आहे ते म्हणजे क्रॉस कनेक्शन. या क्रॉस कनेक्शन मुळेच या दोघांत कनेक्शन बनू लागले. जास्तकरून प्रेमात मुलगा मुलगीला प्रपोज करतो पण इथे काय वेगळंच घडलं. मंजिरीने सरळ जाऊन प्रसादला विचारले की, तुमचं काही ठरलंय का? त्यावर प्रसाद ओक हसले कारण त्यांचा स्वभावच तसा मजेशीर आणि खोडकर आहे. प्रसाद बोलले की, हो माझं ठरलं आहे. हे ऐकल्यावर मंजिरीला टेन्शन आले पण नंतर प्रसाद बोलले की, हो माझं ठरलंय की लग्न केलं तर तुमच्याशीच करणार.

हे ऐकून मंजिरीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्यानंतर दोघांचे प्रेम जुळले. यावेळी मंजिरी अवघ्या १६ वर्षांची होती. प्रेमामध्ये समजूतदारपणा खूप महत्त्वाचा असतो. प्रसाद यांनी आधीच स्पष्ट सांगितले होती की करिअर करणार ते फक्त अभिनय क्षेत्रातच. जर तुझे आईवडील नोकरी कर बोलले तर मी करणार नाही. त्यावेळी चित्रपट एवढे बनत नसायचे त्यामुळे अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्यांना जास्तकरून नाटकं करून पैसे कमवावे लागत. परंतु मंजिरी यांची प्रसादला पूर्ण साथ होती आणि दोघांनी लग्न करायचे ठरवले.

ती नेहमीच प्रसाद यांच्या पाठीशी उभा राहिल्या आहेत. प्रसाद ओक काही काळानंतर एक प्रसिद्ध अभिनेते झाले आणि ह्या प्रेमाच्या गाडीला लग्नाचे रूप मिळू लागले. दोघांचाही एकमेकांवर विश्वास असल्याने घरचेही काही बोलू शकले नाही. शेवटी ७ जानेवारी १९९८ ला प्रसाद आणि मंजिरी यांचे लग्न झाले. प्रसाद ओक आता चांगले अभिनेते आहेत. तुम्हाला प्रसाद आणि मंजिरीची प्रेमकहाणी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *