हिरो तर आपल्याला चित्रपटामध्येच पाहायला मिळतात. पण खऱ्या आयुष्यात देखील अनेक हिरो आहेत आणि त्यांचे देखील लाखो चाहते आहेत. अनेक नेते, उद्योगपती, किंवा समाजकल्याण करणारे आदर्शवादी व्यक्ती देखील खऱ्या आयुष्यातील हिरोच म्हणता येतील. मात्र आज आपण चित्रपटाविषयी बोलणार असल्याने त्यातील हिरो विषयी जाणून घेणार आहोत.
पुष्पा चित्रपट किती गाजला हे तर तुम्हाला माहित आहेच. सोशल मीडियावर देखील त्याच चित्रपटाविषयी काहीतरी येत असतेच. साऊथ मध्ये पुष्पाचे म्हणजेच अल्लू अर्जुन चे लाखो चाहते आहेत. त्याला साऊथचा सलमानखं देखील म्हटले जाते. या अल्लू अर्जुन ला हिंदी जास्त येत नाही मात्र तरी देखील मीडियाशी बोलताना त्याने हिंदी मध्ये संभाषण केले.
अल्लू अर्जुन ला विचारले गेले कि तुझा आवडता बॉलिवूड स्टार कोण आहे. त्यावर अल्लू म्हणाला कि मी बिग बी अमिताभ बच्चन यांचा चाहता आहे. अमिताभ बच्चन हे त्यांच्या काळातील खूप मोठे नायक होते आणि त्यांचे चाहते देखील खूप जास्त होते. आज देखील अमिताभ यांचे लाखो चाहते आहेत. आजची नवीन तरुण पिढी देखील अमिताभ सारख्या नायकाची चाहती आहे पाहून आचार्य वाटते.
बघा व्हिडीओ: