पारंबी चित्रपटातील हि मुलगी पाहून चकित व्हाल

आपली मराठी – हिंदी सिनेसृष्टी बऱ्याच वेगळ्या वेगळ्या कलाकारांनी बनली आहे. प्रत्येक कलाकाराची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अशाच एका मराठी अभिनेत्रीबद्दल आपण इथे आज बोलणार आहोत. जिच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत तिचे नाव सई लोकूर हे आहे. सईचा जन्म ५ सप्टेंबर १९८९ ला कर्नाटकातील बेळगाव येथे झाला.

ती सध्या मुंबईमध्ये राहते. तिचे सर्व शिक्षण मुंबईमधून पूर्ण झाले आहे. तिने बीकॉमची पदवी घेतली आहे. सईने बालकलाकार म्हणून सुद्धा बऱ्याच चित्रपटांसाठी अभिनय केला आहे. ‘कुछ तुम कहो कुछ हम कहे’ हा तिचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट होता. ‘किस किसको प्यार करू’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट होता ज्यात तिने कपील शर्माबरोबर काम केले.

‘प्लॅटफॉर्म, नो एन्ट्री पुढे धोका आहे, पारंबी, आम्हीच तुमचे बाजीराव’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. सईने २०१८ साली ‘बिग बॉस सीजन १’ मध्ये सुद्धा सहभाग घेतला होता, ज्यात ती रनरउप विजेती आहे. सईचे नुकतेच लग्न झाले आहे आणि तेही तिच्या आवडत्या व्यक्तीबरोबर. तीर्थदीप हे सईच्या नवऱ्याचे नाव आहे. या दोघांचाही ३० नोव्हेंबर २०२० ला बेळगाव मध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने विवाह सोहळा पार पडला.

सई ही तिच्या नवऱ्याला दीप म्हणूनच हाक मारत. दीप हा एक इंजिनिअर आहे जो सध्या अमेझॉन मध्ये काम करतो. खरं पाहायला गेलो तर बॉलीवूड तसेच मराठी सिनेसृष्टीचे दुरदूरपर्यंत दीपचे कोणतेही नाते नाही. दोघांच्याही वयातील फरक सुद्धा बरोबर आहे. दिपचे वय ३३ वर्षे आहे तर सई ही ३१ वर्षांची आहे. दीपला मराठी येत नाही कारण तो कोलकत्ताचा आहे. परंतु तो सईबरोबर राहून शिकत आहे. या दोघांचीही जोडी खूप छान आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *