पवित्र रिश्ता सिरीयल मधून प्रसिद्धीस आलेल्या उषा नाडकर्णी

‘पवित्र रिश्ता’ ही झी टीव्हीची खूप प्रसिद्ध अशी मालिका होती. पण त्याहीपेक्षा या मालिकेत अर्चनाबरोबर असणारी सविता म्हणजेच उषा नाडकर्णी या जास्त चर्चेत होत्या. या मालिकेत सविता म्हणजेच उषा ही एक खूप खडूस आणि नेहमी रागात असणारी सासू होती. ती नेहमी सुनेवर राग काढत असे. उषा यांनी ती भूमिका एवढी चांगली केली की त्यांना यासाठी बेस्ट इव्हील सासू चा पुरस्कार सुद्धा मिळाला होता.

उषा यांच्याबद्दल तुम्हाला कदाचित सर्व असेल परंतु तुम्हाला त्यांच्या पती, मुलांबद्दल माहिती आहे का? नसेल तर आज आपण इथे माहीत करून घेणारच आहोत. उषाचा जन्म १३ सप्टेंबर १९४६ ला मुंबई मध्ये झाला. त्यांचे सर्व शिक्षण हे मुंबईतूनच पूर्ण झाले. त्यांनी टीव्हीवरील अभिनयाला १९९९ साली सुरुवात केली. ‘रिश्ते’ या झी मराठीच्या टीव्ही शोमध्ये पहिल्यांदा काम केले.

त्यांचा यामध्ये छोटा रोल होता परंतु तो उषा यांनी खूप चांगल्या पद्धतीने साकारला. त्यांच्या चांगल्या अभिनयामुळे त्यांना पुढे बरीच कामे मिळत गेली. ‘थोडीसी जमीन थोडासा आसमान, विरुद्ध, पवित्र रिश्ता, कैरी’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केले. उषा यांनी बरेच सुपरहिट चित्रपट सुद्धा केले आहेत ज्यामध्ये ‘सिंहासन, माहेरची साडी, पक पक पकाक, देऊळ, स्लॅमबुक’ असे अनेक मराठी चित्रपट तर ‘सडक छाप, शतरंज, वास्तव, कृष्णा कॉटेज, रुस्तम’ अशा अनेक हिंदी चित्रपटात सुद्धा अभिनय केला आहे.

उषा यांनी २०१८ ला मराठी ‘बिग बॉस’ मध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. आई वडिलांनी पसंत केलेल्या व्यावसायिकाबरोबर उषा यांनी लग्न केले ज्यांचे नाव आनंद नाडकर्णी आहे. त्यांना एक मुलगा आहे त्याचे नाव आयुष आहे. आनंद हे लाइमलाईटपासून नेहमी दूरच असतात. आयुष हा सुद्धा उषा यांच्याप्रमाणेच अभिनेता आहे ज्याला आपण बिग बॉस मध्ये पाहिले असेल.

तेव्हा ज्यांनी ज्यांनी आईला बरेवाईट बोलले त्यावेळी हा आईच्या मागे उभा राहिला. आनंद आणि आयुष या दोघांचेही उषावर खूप प्रेम आहे. आयुषबद्दल बोलायचे झाले तर तो अजूनही सिंगलच आहे आणि कोणाला डेटही करत नाही. ही होती उषा यांच्या छोट्याश्या कुटुंबाची माहिती.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *