केजीफ मधल्या रॉकीच्या आईची खऱ्या आयुष्यातील माहिती

केजीफ १ हा हिंदी डब चित्रपट खूपच प्रसिद्ध झाला आहे. हा चित्रपट आधी कन्नड भाषेत रिलीज झाला होता आणि नंतर तो तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेत डब झाला. या चित्रपटाने कन्नड सिनेसृष्टीत सगळ्यात जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाला बरेच पुरस्कारही मिळाले आहेत. याया चित्रपटात रॉकी हे पात्र आहे.

जे आपल्या आईला मरताना जे वचन दिलेले असते ते पूर्ण करण्यासाठी मुंबईमध्ये येतो. तो खाणीमध्ये काम करत असतो जिथे त्याला गरुडा या नावाचा खलनायक भेटतो. याच गरुडाचा त्याला खून करून सगळ्यांना मुक्त करायचे असते आणि आईचे वचनही पूर्ण करायचे होते. रॉकी हे या चित्रपटातील प्रमुख पात्र आहे.

आज आपण इथे याच चित्रपटातील रॉकीच्या आईबद्दल म्हणजेच शांतम्मा बद्दल बोलणार आहोत. त्याच्या आईचे म्हणजेच शांतम्माचे खरे नाव अभिनेत्री अर्चना जॉईस आहे. अर्चना ही कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचा जन्म बेंगळुरूमध्ये झाला. तीचे नुकतेच लग्न झाले आहे आणि श्रेयस उडुपा हे तिच्या नवऱ्याचे नाव आहे.

अर्चनाने केजीफ १, केजीफ २ यांबरोबरच विजयरथा, नकशे, कलांतक यांसारख्या चित्रपटात सुद्धा काम केले आहे. परंतु केजीफ चित्रपटामुळे तिला जास्त प्रसिद्धी मिळाली. अर्चनाला केजीफ चित्रपटासाठी बेस्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सुद्धा भेटला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *