करिष्मा का करिष्मा मधली छोटी बघा आता किती क्युट दिसते

आपण लहान असताना आपल्या आवडीच्या बऱ्याच मालिका होत्या ज्यांचा पुढचा एपिसोड कधी लागणार याची आपण आतुरतेने वाट बघत असायचो. लहान मुलांचे नखरे काही वेगळेच असतात. कोणाला कार्टून बघायला आवडते तर कोणाला जादूवाल्या मालिका तर कोणाला गाणी. तुम्हीही लहान असताना तुमच्या अशा कोणत्या मालिका किंवा कार्यक्रम आवडीचे होते जे बघण्यासाठी तुम्ही आतुर असायचा?

आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आज आपण येथे अश्याच एका लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीबद्दल बोलणार आहे जिने ‘करिश्मा का करिश्मा’ मध्ये रोबोट असणाऱ्या करिश्माची व्यक्तिरेखा साकारली होती. या छोट्या आणि क्युट अशा रोबोटवर दर्शकांनी खूपच प्रेम केले. हा छोटा रोबोट साकारणारी अभिनेत्री आज काय करतेय? कुठे असते? यांसारख्या अनेक गोष्टींची माहिती आपण घेऊयात.

या क्युट मुलीचे नाव झनक शुक्ला आहे. तिचा जन्म २४ जानेवारी १९९६ ला मुंबईत झाला. ‘करिश्मा का करिश्मा’ ही तिची पहिलीच मालिका आहे. यामुळे तिला खूपच पसंत केले जाऊ लागले. झनकला नंतर शाहरुख खानच्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. यामध्ये ती प्रिती झिंटाची छोटी बहीण होती. यानंतर तिला ‘सोनपरी, हातीम, गुमराह’ यांसारख्या मालिकेत आपण सगळ्यांनी पाहिले.

खूपच कमी लोकांना माहीत आहे की झनक ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुप्रिया शुक्लाची मुलगी आहे. सुप्रिया सध्या ‘कुमकूम भाग्य’ आणि ‘कुंडली भाग्य’ या मालिकेत प्रिता अरोरा आणि प्रज्ञाच्या आईची भूमिका साकारत आहे. काही चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर झनकने तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले, त्यामुळे ती नंतर आपल्याला कोणत्या कार्यक्रमात नाही दिसली. परंतु ती मोठी झाल्यावर अजूनही सुंदर दिसत आहे. तिला पुढे जाऊन एक समाजसेविका बनायचे आहे. त्यामुळे झनक आता आपल्याला नंतर मालिकेत दिसणार नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *