आसावरीचा मुलगा परदेशात करतो हे काम

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या सुप्रसिद्ध जोडीने मराठी सिनेसृष्टीत बरेच मनोरंजन करणाऱ्या चित्रपटात काम केले आहे. अशोक सराफ हे सुप्रसिद्ध अभिनेता आहेत. निवेदिता यांचेही बरेच सुपरहिट चित्रपट आहेत परंतु अशोक यांच्याबरोबर लग्न झाल्यावर त्यांनी घराकडे लक्ष द्यायचे ठरवले. बऱ्याच वर्षांनी निवेदिता यांनी पुन्हा काम करायला चालू केले आहे.

‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत सध्या त्या काम करत आहे. या मालिकेत त्या सासूबाईची भूमिका साकारत आहे आणि त्यांची सून ही एक मॉडर्न सून आहे. या मालिकेत सुनच सासूचे लग्न लावून देत आहे जे आपल्याला खूपच दुर्मिळ पाहायला मिळते. निवेदिता सराफ यांना जेव्हा मुलगा झाला तेव्हा त्यांनी पूर्ण वेळ त्याला देता यावा यासाठी काम करणे बंद केले.

असे केल्याने त्यांच्या मुलाच्या प्रत्येक गोष्टीला त्या लक्ष घालू शकत होत्या. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या मुलाचे नाव आहे अनिकेत सराफ. अनिकेतला सगळेजण निक या नावाने हाक मारतात. निक सध्या जे काम करत आहे ते ऐकून तुम्हाला आश्चर्य होईल. सर्वसामान्यपणे आपण असे पाहतो की ज्याचे आई वडील अभिनेता अभिनेत्री आहेत त्यांची मुलेही त्यांचेच काम नंतर पुढे चालू ठेवतात.

पण इथे निकने तसे केले नाही. त्याला स्वतःच्या हिमतीवर उभे राहायचे होते. अनिकेत हा शेफ आहे. अनिकेतने दादर केटरिंग कॉलेजमधून सुरुवातीचे शिक्षण घेतले, त्यानंतर तो पुढच्या शिक्षणासाठी फ्रान्सलाही जाऊन आला आहे. अनिकेत सध्या त्याच्या रेसिपीचे विडिओ बनवून युट्युबवर टाकत असतो.

त्याच्या युट्युब चॅनेलवर दहा लाखांपेक्षा जास्त सबस्क्रॅबरस आहेत. तो हे काम गेल्या चार पाच वर्षांपासून करत आहे. मुलं आईवडिलांच्या पायावर पाय ठेवून तेच काम पुढे चालवायचं बघतात पण अनिकेतने तसे नाही. स्वतःच्या बळावर तो आता उभा आहे आणि यशस्वी सुद्धा. तुम्हालाही अनिकेत आणि अनिकेतचा हा निर्णय कसा वाटतो कंमेंट मध्ये नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *