आमिर खानच्या दोन्ही बायका पहा कशा दिसतात

आमिर खान हे एक सुप्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते आहेत. आमिर म्हणजे एक आदर्श अभिनेता म्हणून सध्याच्या आणि येणाऱ्या पिढीसाठी एक चांगले उदाहरण आहे. आमिरचा जन्म १४ ऑगस्ट १९६५ ला मुंबई मध्ये झाला. मोहम्मद आमिर हुसैन खान हे आमिरचे पूर्ण नाव आहे. यांना ‘मिस्टर परफेक्टनिस आणि चोको बॉय’ म्हणून सुद्धा ओळखले जाते. आमिर हे एक मध्यमवर्गीय इस्लाम कुटुंबात जन्माला आले. त्यांच्या वडिलांचे नाव ताहीर हुसैन आहे तर आईचे नाव जीनद आहे. फैजल खान हे आमिरचे भाऊ आहेत.

अभिनेता इम्रान खान हा आमिरचा भाचा आहे. कुटुंबातील बरेच नातेवाईक हे सिनेसृष्टीत काम करत होते. शाळेत असताना राज्यस्तरीय टेनिस खेळले आहेत. आमिर स्टेट लेव्हल टेनिस खेळाडू आहेत. ‘यादो की बारात’ मध्ये वयाच्या आठव्या वर्षी बालकलाकार म्हणून आमिरने अभिनय केला. आमिर यांचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमध्ये झाले आणि त्यांचे १२ पर्यंतच शिक्षण झाले आहे. आमिर यांनी दोन लग्ने केली आहेत. पहिल्या पत्नीचे नाव रीना दत्ता तर दुसरीचे नाव किरण राव आहे. आमिरने रीना दत्ताबरोबर १९८६ ला लग्न केले.

या दोघांचे काही कारणांवरून वाद झाले आणि दोघांनी २००२ ला घटस्फोट घेता. या दोघांनाही जुनैद हा मुलगा आणि इरा ही मुलगी आहे. तीन वर्षे एकटे राहिल्यानंतर आमिरला किरण राव वरती प्रेम झाले. या दोघांनी २००५ मध्ये लग्न केले. किरण ही सुद्धा एक प्रोड्युसर आणि डायरेक्टर आहे. ‘लगान, साथिया, मान्सून वेडिंग, स्वदेश’ यांसारखे चित्रपट बनवले आहेत. आझाद राव खान हे आमिर आणि किरणच्या मुलाचे नाव आहे जो सरोगसीने जन्मला आहे. तो खूप क्युट दिसतो. तुम्हालाही आमिर खानबद्दल काय वाटते आमच्याबरोबर नक्की शेअर करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *