“आदिवासी मुलींचा सुंदर डान्स बघीतलातं का?”

“जगात नृत्याचे कैक प्रकार बघावयास मिळतात. आणि ह्याचं नृत्यकलेने सर्वांस आपलेसे केलेले आहे. पृथ्वीवर अशी व्यक्ती शोधुन सापडणार नाही कि ज्यास डान्स करणे अथवा किमान बघणे आवडत नसेन. आज जन्मलेल्या मुलापासुन ते वार्धक्यातील व्यक्तिंचे डान्स आपण पहातोय. आजकालच्या सोशल मिडीयामुळे तर ते खुपचं फेमसही झालेत आणि चार पैसेही कमावताहेत हे ही विशेषचं!”

हिपहाॅप,डिस्को ते भारतीय शास्त्रीय नृत्य ते नाटकसंगीत आणि जगप्रसिध्द बाॅलीवुडमधील हे सर्व नृत्यप्रकार सामाविष्ट असलेली विविध धाटणीची संगीतातील नृत्ये आणि गाणी. अगदी आदीम काळापासुन मानवास नृत्याची एक वैगळीचं नशा झालेली दिसते. अश्मयुगापासुन मानव जसजसे टोळी करुन राहु लागला त्याला प्रगत होताना नवनवे शोध लागले. आणि पोटाची,निवार्याची भ्रांत मिटल्यावर चार क्षण सुखाच्या शोधात त्याने कला जोपासली. चित्रकलेपासुन पुढे सुरवात करत तो नृत्यही करु लागला.

कुणा मित्रमैत्रीणिची हळद,लग्न असोत की धार्मिक आणि सार्वजनिक मिरवणुक,ऊत्सव संगीताच्या तालावर फेर धरत काहीवेळ का होईना सर्वचं आपले अंग हलके करतात. काहींना नृत्यात विशेष नैपुण्य असते तर काही बहाद्दर फक्त वरातीत ‘नागीण’ आणि ‘गणपती’त फ्रीस्टाईल #डान्सर ठरतात. सध्या नाचाचे पीक आलेल्या एक से बढकर एक रिॲलीटी शोने तर धुमाकुळचं घातला पण सोबत सर्वच सामाजिक स्तरावरिल टॅलैंटही जगासमोर आणले.

मराठी सिनेकलाकारांनीही आपण कुठेही कमी नाही हे दाखवत सर्वात अगोदर नच बलियै हा शो “सचिन व सुप्रिया पिळगावकर” ह्या जोडीने जिंकुन मराठी झेंडा सातासमुद्रापार रोवलेला! काही समाजांत नृत्य हे ठरलेले असतेचं फक्त प्रसंगानुरुप ते बदलते. ह्यात नेहमी स्थलांतर करणार्या भटक्या विमुक्त जातीजमातीही येतात. पण प्रत्येक राज्यांचेही आपापले वेगळे आणि युनिक असे नृत्यप्रकार प्रसिध्द आहेत. विशेषकरुन आदिवासी समाज आणि त्यांचे नृत्य नेहमीच डोळ्यांची पर्वणी ठरते. तर पाहुयात अश्याचं एका नृत्याचा हा व्हिडीऔ.
स्वप्नील लव्हे

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *