उत्तर प्रदेशच्या पीलीभीत गावात एक अजब घटना घडली. येथील एक महिला आपल्या पतीच्या पासपोर्टवर घरी खोटं सांगून बॉयफ्रेंडसोबत ऑस्ट्रेलियाला गेली. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ही महिला तिथेच अडकली. त्यानंतर तिच्या पतीला पत्नीच्या प्रेम सं बं धा बद्दल माहिती मिळाली. मुख्य म्हणजे ही महिला घरी मैत्रीणींसोबत फिरायला जात असल्याचे सांगून गेली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला ६ जानेवारी रोजी पतीच्या पासपोर्टवर बनावट कागदपत्रं तयार करून बॉयफ्रेंडसोबक ऑस्ट्रेलियाला गेली. मार्चमध्ये पुन्हा भारतात परतण्याचा त्यांचा प्लॅन होता. मात्र लॉकडाऊनमुळे दोघे तिकडेच अडकले. आता अनलॉकनंतर ही महिला २४ ऑगस्ट रोजी भारतात परतली. भारतात परतल्यानंतर पतीला पत्नीच्या प्रेम सं बं धा बाबत कळलं आणि त्यानं पोलिसात त क्रा र केली.
पतीच्या त क्रा री नंतर पोलीस अधिक्षक जय प्रकाश यादव यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देऊन दोघां वि रु द्ध त क्रा र नोंदवली. गेल्या २० वर्षांपासून महिलेचा पती मुंबईत कामानिमित्त राहत होता. पत्नीला भेटण्यासाठी तो आपल्या गावी पीलीभीतला जात होता.
लॉकडाऊन लागू झाल्यानंतर या महिलेचा पती गावी परतला. तेव्हा त्याला कळले की पत्नी ऑस्ट्रेलियाला गेली आहे. पत्नीनं घरी पतीसोबत फिरायला जात असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी केलेल्या तपासणीत या महिलेनं आणि तिच्या बॉयफ्रेंडनं महिलेच्या पतीच्या नावाने २ फ्रेबुवारी २०१९ रोजी पासपोर्ट तयार केल्याचे कळले. त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला.
सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून त्या महिलेला आणि तिच्या बॉयफ्रेंडला फसवणूकीच्या गु न्ह्या अंतर्गत अ ट क करण्यात आली आहे.