सुप्रसिद्ध हास्यसम्राट आणि अतिशय लोकप्रिय असे व्यक्तिमत्त्व म्हणजे भाऊ कदम. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे काही ना काही भूतकाळ हा असतोच. जी व्यक्ती एक गरीब परिस्थितीमधून मोठी होते तेव्हा त्याला त्याच्या प्रत्येक गोष्टीची किंमत असते. भाऊ कदमही असेच आहेत. भाऊ कदम यांच्या घरची परिस्थिती आधी कशी होती? भाऊ आधी कोणते काम करत होते? या सगळ्यांची माहिती आपण आज इथे करून घेऊयात.
१२ जून १९७२ ला मुंबईतील वडाळा येथे भाऊंचा जन्म झाला. त्यांच्या आई वडिलांनी त्याचे नाव भालचंद्र ठेवले होते. त्यांचे पुणे नाव भालचंद्र पांडुरंग कदम आहे. परंतु भालचंद्र हे नाव हाक मारताना खूप मोठे वाटायचे त्यामुळे त्यांना काहीजण भाऊ म्हणू लागले आणि यामुळेच आता त्यांचे नाव भाऊ कदम आहे. भाऊंचे वडील भारत पेट्रोलियम पंपावर काम करत होते. आई ही गृहिणी आहे.
भाऊ यांचे शालेय शिक्षण वडाळा येथे झाले. शाळेत असताना भाऊ खूप खोडकर आणि लाजाळू होते. शाळेत असताना त्यांनी बऱ्याच कार्यक्रमात अभिनय केले. पण त्यांना नेहमी वाटायचे की आपल्या रंग रुपामुळे आपल्याला अभिनेता नाही बनता येणार. भाऊ कदम यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले त्यामुळे घराची सर्व जबाबदारी ही भाऊंवर आली. भाऊंनी छोट्या मोठ्या नाटकांमध्ये काम करायला चालू केले.
नंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब डोंबिवलीला राहायला आले. अभिनय करणे चालू ठेवले पण भाऊंना पाहिजे तसे पैसे मिळत नव्हते त्यामुळे त्यांनी अभिनय करणं सोडून द्यायचं ठरवलं आणि नोकरी करू लागले. भाऊंनी नंतर पानाची टपरी टाकली. त्यांना असे वाटले की आपल्याला आता अभिनयामध्ये पुढे काही करता नाही येणार. नंतर दिग्दर्शक विजय निकम हे भाऊंच्या घरी आले आणि त्यांना नाटकात काम करायचा आग्रह केला.
ते नाटक खूप प्रसिद्ध झाले. यानंतर त्यांनी बरीच नाटके केली. भाऊ कदम त्यांच्या हसवण्याच्या कलेमुळे प्रसिद्ध झाले आणि त्यांना बऱ्याच संध्या चालून येऊ लागल्या. भाऊंना झी मराठीच्या फू बाई फु या कॉमेडी शोसाठी सुद्धा संधी मिळाली. पण आपल्याला ते काम जमेल का आणि लोकांना ते आवडेल का असे बरेच विचार मनात आल्यानं त्यांनी ते काम नाही केले.
फु बाई फुच्या दुसऱ्या सीझन मध्ये सुद्धा त्यांना संधी भेटत होती पण त्यांनी ती नाकारली. नंतर सीझन तीन मध्ये सुद्धा संधी आली त्यावेळी त्यांच्या पत्नी आणि मुलीने त्यांना जाण्याचा आग्रह केला. नंतर त्यांनी फु बाई फु मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांनी सुप्रिया पठारे, वैभव मांगले यांच्याबरोबर काम केले. फु बाई फु मुळे भाऊ कदम लोकांच्या घराघरांत पोहचले आणि त्यांना बरेच अवॉर्डस सुद्धा भेटू लागले.
भाऊंनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले. २०१४ मध्ये झी मराठीने मराठी चित्रपटांच्या प्रोमोशनसाठी एक कार्यक्रम काढायचे ठरवले ज्याचे नाव होते चला हवा येऊ द्या. यामध्येही भाऊ कदम यांना ऑफर आली. या कार्यक्रमामध्ये भाऊंनी बऱ्याच व्यक्तीची सोंग घेऊन दर्शकांना खळखळून हसवले आहे. भाऊ कदम यांची परिस्थिती आता बदलू लागली होती. जे कधी मनातही नव्हते की आपण एवढे मोठे स्टार होऊ ते स्वप्न पूर्ण झाले. भाऊ हे मनाने अतिशय दयाळू आणि समजूतदार आहेत. तुम्हालाही भाऊ कदम कसे वाटत कमेंटमधे नक्की कळवा.