Breaking News
Home / कलाकार / सोनाली कुलकर्णी चा नवरा पहा कोण आहे

सोनाली कुलकर्णी चा नवरा पहा कोण आहे

सध्या लॉकडाउनचा काळ चालू आहे, त्यामुळे या वेळेत बऱ्याच जणांनी आपली लग्ने केली किंवा काहींनी निदान साखरपुडा तरी केला आहे. या बऱ्याच जणांमध्ये आपले सिनेसृष्टीतील कलाकार सुद्धा आहेत. अशीच एक खुशखबर घेऊन आली आहे आपली लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी. सोनालीने आपल्या दिलखेचक नखऱ्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘बकुळा नामदेव घोटाळे’ हा तिचा पहिला मराठी चित्रपट ज्यासाठी तिला पुरस्कार सुद्धा मिळाला होता.

‘नटरंग’ या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ हे गाणे खूप गाजले होते. सोनाली सध्या झी युवाच्या ‘युवा डांसिंग क्वीन’ या शो मध्ये परीक्षक म्हणून आहे. तिच्या ‘हिरकणी’ या चित्रपटाने बरेच रेकॉर्ड तोडले आहेत. सोनालीने आजपर्यंत बरेच चित्रपट केले आहे आणि तिचा अभिनयही अतिशय उत्तम आहे. सोनालीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना एक सुखद धक्का दिला तो म्हणजे तिच्या साखरपुड्याचा फोटो तिच्या अकाऊंट वर पोस्ट केला. ‘सगळ्यांचा आशिर्वाद आमच्या पाठीशी राहुद्या’ असंही तिने पोस्टमध्ये सांगितले.

सोनालीचा २ फेब्रुवारी २०२० ला साखरपुडा दुबई मध्ये पार पडला. या कार्यक्रमाला मोजकेच आणि जवळचे लोक उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून सोनाली कुलकर्णीच्या लग्नाच्या चर्चा चालू होत्या पण अखेर ती वेळ आलीच आणि त्या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. तिच्या होणाऱ्या पतीचे नाव कुणाल बेनवडेकर आहे. मूळचा लंडनचा असलेला कुणाल नोकरीसाठी आता दुबईला स्थायिक झाला आहे. कुणालचे सर्व शिक्षण लंडन येथेच झाले आहे. सोनाली आणि कुणाल हे जुने मित्रमैत्रीण आहेत.

२०१८ पासून ते एकमेकांचे मित्र आहेत आणि त्यांनी बरेच सण एकत्र साजरे केले आहेत. तिने कुणाल सोबतचे नाते लोकांपासून लपवून ठेवले होते. ‘ती अँड ती’ या चित्रपटाच्या शूटिंग साठी सोनाली लंडनला गेली होती. तिकडे तिच्या कुटुंबाच्या ओळखीने तिची कुणालबरोबर पहिली भेट झाली. त्यांनीच तिला लग्नाची मागणी घातली. कुणालला केनो या नावानेही ओळखले जाते. दुबईच्या एएसएल इंटरनॅशनल या कंपनीमध्ये काम करतो. या दोघांचीही जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *