सुरू आजीमुले देवमाणुस होणार बंद

झी मराठीवरील ‘देवमाणुस’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस पडली. ही मालिका एका सत्य घट’नेवर आधारित आहे आणि त्यामुळेच या मालिकेत पुढे काय होणार आणि नंतरचा नवीन भाग कधी प्रसारित होणार याकडे दर्शकांचे लक्ष लागून राहिलेले असते. या मालिकेतील खु’नी म्हणजेच डॉ’क्टर हा पोलिसांच्या तावडीत कसा सापडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

परंतु आता एक नवीनच वादाचा भोवरा निर्माण झाला आहे. मालिकेतील सरू आजी तर तुमच्या ओळखीची असेलच. सरूआजीच्या एका बोललेल्या म्हणीमुळे ह्या मालिकेवर अनेकजण टीका करत आहेत. अशी कोणती म्हण आहे ज्यामुळे या मालिकेवर एवढी टीका केली जात आहे. चला तर मग अधिक माहितीसाठी पुढे नक्की वाचत रहा.

‘देवमाणूस’ मालिकेच्या १३ जुलैच्या भागात सरू आजीने एक म्हण बोलली त्यामुळे ही मालिका वादात आली आहे. ‘आपलीच मोरी, अंघोळीला चोरी’ ही म्हण सरू आजी एका प्रसंगी वापरते. या प्रसंगाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर कोणीतरी पोस्ट केला आणि तो बराच वायरल सुद्धा झाला. ‘आपलीच मोरी, अंघोळीला चोरी’ ही म्हण बऱ्याच जणांना अ’श्ली’ल वाटत आहे त्यामुळे अनेकांनी यावर टी’का करायला चालू केले आहे.

यामुळे झी मराठी वाहिनीवरसुद्धा टी’का केली जात आहे. यावर प्रतिक्रिया म्हणून झी मराठी वाहिनी म्हणते की, ‘हा एक खोडसरपणा आहे. वाहिनीचे नाव खराब करण्यासाठी या व्हिडिओवर टी’का केली जात आहे आणि यामध्ये काही तथ्य नाही. झी मराठी एक जबाबदार वाहिनी आहे. मालिकेत कोणताही अ’श्ली’ल संवाद केला गेला नाही.’ मित्रांनो, तुमचीही या म्हणीवर काय प्रतिक्रिया आहे? आम्हाला कळवायला विसरू नका.

https://www.instagram.com/p/CRUIP-7CaYA/

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *