सुख म्हणजे नक्की काय असतं मधील शालिनी विषयी बरच काही

टीव्हीवरच्या मालिका-चित्रपट म्हणजे आपली खूप चांगली करमणूक आहे. मालिकेतील प्रमुख भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्री आणि अभिनेत्याला दर्शक बरच प्रेम देतात. या प्रमुख भूमिकेत असणाऱ्या कलाकारांना तेव्हाच प्रसिद्धी मिळते जेव्हा त्या मालिकेत एखादा व्हिलन असतो. व्हिलनने केलेल्या वाईट गोष्टीमुळे प्रमुख भूमिकेतील कलाकारांना आपण जास्त पसंत करतो.

हे सगळं आपण इथे बोलत आहोत कारण आज आपण इथे ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ या मालिकेतील गौरीला त्रास देणाऱ्या शालिनीबद्दल म्हणजेच जी या मालिकेतील व्हिलन आहे तिची खऱ्या आयुष्यातील माहिती घेणार आहोत. शालिनीचे खरे नाव अभिनेत्री माधवी नेमकर आहे. तिचा जन्म १७ मे ला पुण्यातील खोपोली येथे झाला.

२०१० मध्ये माधवीचा विवाह विक्रांत कुलकर्णी यांच्याबरोबर झाला असून त्यांना एक मुलगाही आहे. ती आरोग्याच्या बाबतीत विचार करते त्याबरोबर व्यायामही करते. ती दर्शकांना व्यायामाबद्दल आणि आहाराबद्दलही टिप्स देत असते. सोशल मीडिया तसेच न्युज चॅनेलवर ती योग गुरू म्हणून प्रसिद्ध आहे. २००७ ला ‘गाणे तुमचे आमचे’ या कार्यक्रमासाठी निवेदिका म्हणून बोलवण्यात आले आणि यामुळेच तिचा आत्मविश्वास वाढला.

त्यामुळे तिने नंतर अभिनय करायचे ठरवले. एकांकिका, नाटक करत करत ती नोकरीही करायची. नंतर स्टार प्रवाहच्या ‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेत काम करायची संधी मिळाली. ‘अवघाची संसार, जावई विकत घेणे आहे, हम तो तेरे आशिक है’ या मालिकांमधून त्या प्रेक्षकांच्या घरात पोहचल्या.

तिने ‘संघर्ष, नवरा माझा भोवरा, सगळं करून पाहिलं, धावाधाव’ यांसारख्या चित्रपटात काम केले. तिच्या अनेक नाटकांपैकी ‘महारथी’ हे तिचे गाजलेले नाटक आहे. निवेदक ते यशस्वी अभिनेत्रीचा माधवीची प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कंमेन्टमध्ये नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *