Breaking News
Home / कलाकार / साऊथ मधील सुपरस्टार हिरोईन ने पाण्यात केला हनिमून

साऊथ मधील सुपरस्टार हिरोईन ने पाण्यात केला हनिमून

दक्षिण भारताच्या सिनेसृष्टीत काम करणाऱ्या तसेच हिंदी सिनेसृष्टीतही आपली छाप टाकणाऱ्या अभिनेत्री काजल अग्रवालने काही दिवसांपूर्वी तिचा मित्र गौतम किचलू बरोबर लग्न केले. खूप दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी अखेर ३० ऑक्टोबरला लग्न केले.

दोघांचे हे लग्न खूपच गाजले आणि त्यांच्या लग्नाच्या सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टला सुद्धा बरेच लाईक्स मिळाले.

कोरोनामुळे काजलच्या लग्नात खूपच कमी लोकांची उपस्थिती होती. काजलचा नवरा म्हणजेच गौतम एक इंटीरियर डिज़ाइनर आहे त्याबरोबरच तो डिस्सर्न लिविंग डिलजाइन शॉपचा फाउंडर सुद्धा आहे.

काजलनेही बऱ्याच साउथ चित्रपटात काम केले आहे तर बॉलीवुडमधल्या ‘सिंघम’, ‘स्पेशल 26’ या चित्रपटातही काम केले आहे.

लग्नानंतर काजल अग्रवालच्या हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होत आहेत. काजलने त्यांचा हनीमून मालदीव मध्ये व्यतीत केला आहे. इथे ती एक पाण्याखाली बांधलेल्या बंगल्यात राहिली होती.

सध्या हे पाण्याखाली बांधलेले बंगले सुद्धा खूप प्रसिद्ध होत आहेत. ज्या पाण्याखालील बंगल्यात काजल आणि तिचा नवरा थांबले होते त्या बंगल्याचे नाव ‘द मुराका’ असे आहे.

हा बंगला अतिशय सुंदर असल्याने खूप प्रसिद्धही आहे. तो बंगला एवढा सुंदर आहे तर साहजिकच तिथे जाऊन काही दिवस राहण्याची किंमतही तेवढीच जास्त असणार. तुम्हाला जर या ठिकाणी राहण्याची किंमत सांगितली तर तुम्ही हैराण व्हाल. हा बंगला बांधण्यासाठी एकूण १५ मिलियन डॉलर खर्च झाले आहेत.

या बंगल्यात राहण्यासाठी एका रात्रीला तुम्हाला ५० हजार डॉलर खर्च होतो. हा जगातील पहिला पाण्याखाली बांधलेला बंगला असल्याने त्याची किंमत खूप महाग आहे. समुद्र पातळीच्या १६ फूट खाली हा बंगला बांधण्यात आला आहे.

याच्या ज्या भिंती आहेत त्या काचेपासून बनल्या आहेत जेणेकरून तुम्हाला खाली पाण्यात असताना सगळे प्राणी दिसू शकतात.

२०१८ मध्ये हा बंगला पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला होता. स्टील, काँक्रीट आणि ऐक्रेलिक पासून बनवलेल्या बंगल्यात जिम आणि प्राइवेट सिक्योरिटी डिटेल्ससाठी एक वेगळा विभागसुद्धा बनवण्यात आला आहे.

काजलने हॉटेलचे जे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत त्यात तुम्ही समुद्र जीवांना पाहू शकता. त्या फोटोमध्ये तुम्हाला गौतम किचलू सुद्धा पहायला मिळतील. बेडरूमचाही एक फोटो तिने पोस्ट केला आहे.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *