‘शोले’ चित्रपटामध्ये कालिया या भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्याने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. हा चित्रपट आजही आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळतो. कालियाचे खरे नाव विठ्ठल बाबुराव खोटे आहे पण त्यांना विजू या नावानेही ओळखले जाते. १७ डिसेंबर १९४१ मध्ये मुंबईला विजू यांचा जन्म झाला. त्यांचे वडील नंदू खोटे हे सुद्धा सायलेंट फिल्ममध्ये अभिनेता होते. निम्मा यांच्याबरोबर त्यांचे लग्न झाले आणि त्यांना सुनील आणि लकी ही दोन मुले आहेत. त्यांची मोठी बहीण शोभा खोटे ही सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री होती.
शुभा या विजू यांच्यापेक्षा ५ वर्षांनी मोठ्या आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री दुर्गा खोटे ही सुद्धा त्यांच्या नात्यातील आहे. ‘शोले’ मधील त्यांचा ‘स स सरदार मैने आपका नमक खाया है’ हा डायलॉग खूप प्रसिद्ध आहे. ‘या मलाख’ या त्यांच्या बालकलाकार म्हणून पहिल्या चित्रपटात त्यांनी मेहमुदच्या मित्राची भूमिका साकारली होती. विजू अभ्यासामध्ये खूप हुशार होते त्यामुळे सगळ्यांना वाटायचे की हा अभिनय करणार नाही. विजू यांची मैत्री मनमोहन देसाई यांच्याबरोबर झाली तेव्हा मनमोहन यांनी विजूना त्यांच्या ‘सच्चा झुठा’ या चित्रपटात अभिनय करण्यासाठी विचारले.
विजू तयार झाले आणि त्यांनी एका खलनायकाची भूमिका साकारली तर ‘जीने की राह’ या चित्रपटात एका कॉमेडीअनची भूमिका साकारली. ‘शोले’ या प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी कालियाची भूमिका केली आहे. शोलेची शूटिंग करतानाचा एक मजेशीर किस्सा आहे. विजू यांना एक घोडा दिला गेला होता पण सेटवरील एक स्पॉटबॉय मुद्दाम छत्री उघडत असे आणि तेव्हा तो घोडा विजू यांना खाली पाडत असे. यामधील गब्बर सुद्धा विजू यांचा जवळचा मित्र आहे. दोघांनी एकत्र बरेच चित्रपट केले. ‘अंदाज अपना अपना’ मधील रॉबर्ट ही भूमिका त्यांना जास्त आवडली होती.
विजू यांच्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे आणि मजेशीर स्वभाव तसेच शूटिंगच्या वेळी डायलॉग बोललेले यांमुळे त्यांना नेहमी काम मिळू लागले. ‘अनोखी रात, शरीफ गुंडा, अंदाज अपना अपना, शोले, चायना गेट, गोलमाल ३, अतिथी तुम कब जाओगे’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे. ‘जाने क्यू दे यारो’ हा त्यांचा शेवटचा २०१८ मध्ये रिलीज झालेला चित्रपट होता. ३० सप्टेंबर २०१९ ला विजू खोटे यांचे मुंबईत निधन झाले. भारतीय सिनेसृष्टीत विजू खोटे यांच्यासारखा कोणता अभिनेता होता आणि नंतरही कोणी नसेल.