टीव्हीवर बऱ्याच नव्या मालिका चित्रपट सतत आपल्या मनोरंजनासाठी येत असतात. कलाकारही त्याची पूर्ण कला कशी चांगल्या पद्धतीने दर्शकांना सादर करता येईल याची पूर्ण खबरदारी घेत असतात. झी मराठी वाहिनीवर एक नवीन मालिका आली आहे ती म्हणजे टोटल हुबलाक. ही मालिका वाघोबा प्रोडक्शनची आहे.
या मालिकेत आपल्याला अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री मोनालीसा बागल हे दोघेही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. अभिनेता किरण गायकवाड यांनी याआधी ‘लागीर झालं जी’ या सुप्रसिद्ध मालिकेत भैय्यासाहेबांची भूमिका निभावली होती. लागीर झालं जी या मालिकेमुळे भैय्यासाहेबांना ओळखले जाऊ लागले.
त्यांची ती भूमिका आणि अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस आले. त्यामुळे दर्शक अजूनही लागीर झालं जी या मालिकेतील भैय्यासाहेबांना ओळखतात. अभिनेत्री मोनालीसा बागल हिने आधी ‘प्रेमसंकट, ड्राय डे, झाला बोभाटा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय या मालिकेत राहुल मगदूम, महेश जाधव, अमरनाथ खराडे हेदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
या पूर्वी हे सगळे लागीर झालं जी या मालिकेतही झळकले होते. या मालिकेचे दिग्दर्शन तेजपाल वाघ यांनी केले आहे. तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा राहुल्या, टॅलेंट, जम्या आणि भैय्यासाहेब या मालिकेमधून दिसणार आहेत. या मालिकेचा प्रोमो शेअर करायच्या आधी अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री मोनालीसा बागल यांनी त्यांच्या लग्नाचा फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला होता.
ती पोस्ट पाहून त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. सगळ्यांना असे वाटले की या दोघांनी लग्न केले आणि त्यांच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. त्या दोघांचेही लग्न झाले असे समजून त्यांच्या या लग्नासाठी दोघांनाही सोशल मीडियावर शुभेच्छा देत होते. परंतु काही वेळातच हे त्यांचे खरे लग्न नसून ‘टोटल हुबलाक’ या मालिकेचे प्रोमोशन आहे असे समजले.
तुम्हालाही नक्कीच राहुल्या, टॅलेंट, जम्या आणि भैय्यासाहेब यांना बघण्याची आतुरता असेल. छोट्या पडद्यावरील अशा उगवत्या प्रतिभेला, कलाकारांना आपण दर्शकांनी नेहमीच जशी साथ दिली आहे तशी द्यावी असे मला वाटते.