Home / कलाकार / रात्री चे बारा वाजून गेल्यावर बायको नवऱ्याला म्हणते माझ्या कडे

रात्री चे बारा वाजून गेल्यावर बायको नवऱ्याला म्हणते माझ्या कडे

मित्रानो रोजच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन खूप गरजेचे आहे. हसल्याने आयुष्य वाढते असे तुम्ही ऐकले असेलच म्हणून तुम्हाला हसवायला रोज नवीन नवीन जोक घेऊन येत असतो. जीवनात दुःख अडचणी येताच असतात पण त्यामुळे खचून न जाता तणाव मुक्त जगणे गरजेचे आहे. जीवन हे एकदाच मिळते त्यामुळे ते आनंदाने जगावे जर तुम्हाला काही ताण तणाव असेल किंवा तुमचा मुड चांगला नसेल तर आमचे आजचे जोक्स तुमचा मूड चांगला करू शकतात. तुम्हाला आमचे जोक आवडले तर तुम्ही ते लाईक, कमेंट करून नक्की कळत राहा.

जोक: बायकोला चारचाकी गाडी शिकायची असते पण नवरा सतत नाही म्हणत असतो. बायकोचा जास्तच हट्ट असल्याने तो तिला ड्राइव्हिंग स्कुल मध्ये गाडी शिकायला पाठवतो.
ड्राइविंग क्लास मध्ये ड्राइविंग पूर्ण झाल्यावर बायको लायसन्स काढायला जाते तेव्हा तीच तीन वेळा लायसन्स रद्द होत. कारण RTO वाला बायकोला म्हणतो, वहिनी समजा एका बाजूनं तुमचा सख्खा भाऊ आणि एक बाजूनं तुमचा नवरा आला तर काय माराल? यावर बायको म्हणते, नवरा ….!!!!
RTO वाला म्हणतो अहो वहिनी हात जोडून शेवटचं सांगतो ब्रेक मारायचा आहे ब्रेक……

जोक: नवरा बायको लग्नाची कॅसेट बघत असतात दोघेही खुश असतात. बायको खूप खुश असते आणि नवऱ्याशी गप्पा मारत असते. ती नवऱ्याला म्हणते, माझा मोठेपणा पाहिलात का मी तुम्हाला न बघताच तुमच्याशी लग्न केलं.
यावर नवरा म्हणतो, त्यापेक्षा माझा मोठेपणा बघ….. मी तुला बघून सुध्दा तुझ्याशिच लग्न केलं.

जोक: बायको लाडामध्ये येऊन नवऱ्याला म्हणते – जा तुम्ही तुमचं माझ्यावर प्रेमच उरलं नाही. नवरा (सावधपणे) – तुला अस का वाटतंय जानू…?
बायको – मग काय? पूर्वी कसे मला माझी रसमलाई, माझी रबडी, माझी बासुंदी, असं म्हणायचात….आता नाही म्हणत …आम्ही नाही जा…
नवरा बायकोला समजावत म्हणतो – अगं, दुधाचे पदार्थ किती दिवस ताजे राहणार…?(भांड फेकून मारलं बाईने)

जोक: एका माणसाची बायको चार पाच दिवस घरी येत नाही म्हणून तो तक्रार करायला जातो आणि म्हणतो साहेब माझी बायको हरवलीय ….
यावर तिकडचा व्यक्ती म्हणतो हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पोलिस स्टेशन नाही.. तक्रार द्यायला पोलीस स्टेशन मध्ये जा ….
माणूस – च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच कळत नाही…

जोक: नवरा बायको जेवायला बसलेले असतात त्यावेळी बायको नवऱ्याला म्हणते लोणच्याची बरणी घेऊन या.
नवरा किचन मधून शोधाशोध झाल्यानंतर बायकोला आवाज देतो कुठे आहे बरणी सापडत नाहीये.
बायको-तुमचं घरात लक्ष असतंच कुठे? मला माहिती होतं ,तुम्हाला बरणी सापडणार नाही बरणी… म्हणूनच मी अगोदरच बरणी घेऊन आले.

जोक: दोन मित्र खूप दिवसांनी भेटतात त्यामुळे त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगतात. पहिला म्हणतो माझी बायको खूप चांगली आहे रे माझ्यावर खूप प्रेम करते. मला माझ्या घरी कसलं कामच करावं लागत नाही सर्व तीच सांभाळते.
हे बोलणं ऐकल्यावर दुसरा मित्र म्हणतो, जेवण झाल्यावर एकदा पडद्याला हात पुसुन पहा. तुझा सगळा गैरसमज दूर होईल…..!!!!

जोक: अमेरिकेतली जोडपी झोपताना ‘Good night my love’ अस म्हणून झोपतात. तर दुसरीकडे इंग्लंड मधील जोडपी झोपताना ‘Sweet Dream Darling ‘ असं म्हणून झोपतात.
पण आपल्या भारतातील जोडपी झोपताना नवऱ्याला दोन तीन वेळा झोपेतून उठवणार आणि म्हणार ‘सिलिंडर खालून बंद केलं का हो’.

जोक: जेवण झाल्यानंतर रात्री नवरा बायको झोपायला आपल्या रुम मध्ये जातात. बेड ची चादर बायको झटकून टाकते त्यानंतर दोघेही झोपायला लागतात.
रात्रीचे बारा वाजून गेल्यानंतर बायकोला भीती वाटू लागते आणि ती नवऱ्याला म्हणते, अहो माझ्याकडे तोंड करून झोपा ना प्लिज मला भीती वाटते.
यावर नवरा म्हणतो, म्हणजे मी घाबरून मेलो तरी चालेल.

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.