Home / कलाकार / रातोरात फेमस झाल्या या अभिनेत्री आणि नंतर अचानक गायब झाल्या

रातोरात फेमस झाल्या या अभिनेत्री आणि नंतर अचानक गायब झाल्या

सारा अली खानचा पहिला चित्रपट केदारनाथ आणि दुसरा सिम्बा. या दोन्ही चित्रपटामुळे ती रातोरात प्रसिद्ध झाली. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या असंच रातोरात प्रसिद्ध झाल्या आहेत पण त्या सध्या कुठे गेल्या याची कुणाला कल्पना नाही. अशाच काही अभिनेत्र्यांची आपण नावे पाहुयात.

१. अनु अग्रवाल यांनी केलेला ‘आशिकी’ हा चित्रपट ९० च्या दशकात खूप प्रसिद्ध झाला. त्या दशकात हा रोमँटिक चित्रपट खूप पसंतीस उतरला. राहुल रॉय आणि अनु अग्रवाल हे दोघे रातोरात या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाले. परंतु आज ते दोघेही चित्रपटसृष्टीपासून लांब आहेत. बॉलीवूडच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात त्यांचा पत्ता नाहीये.

२. अमिषा पटेल आणि हृतिक रोशन यांचा ‘कहो ना प्यार हैं’ हा चित्रपट खूप प्रसिद्ध झाला. अमिषाने याच चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. याच चित्रपटामुळे ती बॉलीवूड मधल्या टॉप १० अभिनेत्र्यांमध्ये गणली जाते. ‘गदर’ हा चित्रपट अमिषाने सनी देओल यांच्याबरोबर केला आणि तोही चित्रपट बराच चालला.

३. ‘अनारी’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘जीत’,’हा मैंने भी प्यार किया’, ‘जानवर’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री करिश्मा कपूर हिला कोण नाही ओळखत. करिश्मा लग्नानंतर बॉलीवूडपासून लांब आहे. पण आता ती बॉलीवूडमध्ये काम करायला तयार आहे.

४. ग्रेसी सिंह हिने आमीर खानबरोबर ‘लगान’ या चित्रपटात काम केले आणि ती रातोरात प्रसिद्ध झाली. ‘गंगाजल’,’मुन्नाभाई एमबीबीएस’,’हम आपके दिल मे रेहते हैं’ या चित्रपटांत काम केले. ती आता बॉलीवूड पासून खूप लांब गेली आहे.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published.