स्टार प्रवाहच्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमध्ये बरीच वेगळी वेगळी वळण येत आहेत. हा शो रोजच अतिशय रंजक असा बनत चालला आहे. पुढे काय होईल याची नेहमीच उत्सुकता लागलेली असते. या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी एका मोठ्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे, जी सध्या कार्तिक आणि दीपा या दोघांमध्ये फूट पाडत आहे. ही फूट पडणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कार्तिकची कॉलेजमधली अतिशय जवळची अशी मैत्रीण तनुजा भारद्वाज आहे.
तनुजाने आधी दीपाला कसे विश्वासात घेतले आणि कार्तिकच्या जवळ जाण्याचा प्लॅन करत आहे हे तुम्ही पाहिलेच असेल. तिला कार्तिकपासून दीपाला वेगळे करायचे असते आणि कार्तिकबरोबर लग्न करायचे असते. पण दीपालाही आता तिचे हे सत्य समजले आहे. चला तर मग याच तनुजाच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेऊयात. तनुजाचे खरे नाव अभिनेत्री अभीज्ञा भावे आहे. तिचा जन्म १३ मार्च १९८९ ला वसई मध्ये झाला. अभीज्ञा ही तिच्या टीव्ही शोमधील अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.
झी मराठीच्या ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत पहिल्यांदाच नकारात्मक व्यक्तिरेखा साकारली होती. ती मालिका खूपच सुपरहिट झाली होती. झी मराठीच्या ‘तुला पाहते रे’ या सुबोध भावे बरोबर तिने मायराची भूमिका साकारली होती. त्या मायराची नंतर घराघरांत चर्चा होऊ लागली. ‘मुविंग आऊट’ या वेबसिरिस मध्येही अभीज्ञाने काम केले आहे. ‘चला हवा येऊन द्या सेलेब्रिटी पॅटर्न’ मध्ये ती फाईनालिस्ट ठरली होती. नुकताच तिचा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव मेहुल पै असे आहे.
काही दिवसांपूर्वीच अभीज्ञाने आपण प्रेमात आहोत याची कबुली दिली होती. तिच्या साखरपुड्याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. लवकरच अभीज्ञा आणि मेहुल लग्नबंधनात अडकणार आहेत. अभीज्ञाचे हे दुसरे लग्न असून तिचे पहिले लग्न वरूण वैतिकर याच्याबरोबर झाले होते. पण त्यांचे ते नाते जास्त काळ टिकले नाही आणि नंतर अभीज्ञा मेहुलला डेट करत होती. या अभीज्ञा आणि मेहुल दोघांच्याही जोडीला चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तुम्हालाही यांची जोडी कशी वाटते नक्की सांगा.