Home / कलाकार / या मुलाने बनवली पायपांची बोट आणि पाण्यात बोट नेल्यावर काय झाले पहा

या मुलाने बनवली पायपांची बोट आणि पाण्यात बोट नेल्यावर काय झाले पहा

अनेक अशा वस्तू किंवा घरातील रोज उपयोगाला येणाऱ्या गोष्टी या जास्तकरून आपण घरीच बनवण्याचा प्रयत्न करतो. सध्या कोरोना असल्याने एकतर लोकांकडे जास्त पैसे नाहीत आणि त्यामुळे ते त्यांना पाहिजे त्या वस्तू विकतही घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत व्यक्ती आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींचा वापर करून काहीतरी जुगाड करून आपल्याला पाहिजे ती वस्तू बनवण्यासाठी प्रयत्न करतो.

आपल्या भारतात अनेकजण आहेत जे असा जुगाड करण्यात पटाईत आहेत. असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही ती वस्तू बनवावी आणि तशी मजा करावी असे वाटेल. या व्हिडिओत जर तुम्ही पाहिले तर या मुलाने जुगाड करून एक बोट बनवली आहे जी तो त्या पाण्यात चालवणार आहे.

साधारणपणे बोट तयार करण्यासाठी लाकडाची गरज असते पण याने पीव्हीसी पाईपचा वापर करून दोन माणसांसाठी बोट बनवली आहे. या बोटीवर बसण्यासाठी खुर्ची ठेवली आहे आणि ती पण तुम्ही जुनी खुर्ची वापरू शकता ज्याचे पाय खराब झाले आहेत. काही लोखंडाच्या पट्ट्या त्या पाईपला आधार देण्यासाठी लावल्या आहेत.

तुम्ही पाहिलेच असेल की ही बोट बनवायला किती कमी वेळ लागतो. पाण्यात उतरल्यानंतरही ही बोट काय कमाल करते? हे तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की पहा. तुम्ही चप्प्याने किंवा स्वतःच्या पायाने सुद्धा तिला चालवू शकता. तर ही जुगाडू बोट तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. लाईक कमेंट आणि शेअर नक्कीच करा.

पहा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.