या झाडासाठी खर्च केले जातात १५ लाख रुपये, असतो कडक पहारा

या झाडाला पाणी देण्यासाठी स्थानिक नगरपालिकेकडून एका पाण्याच्या टॅंकरची व्यवस्था करण्यात आली आहे. या झाडाला कुठलीही रोगराई किंवा कीड लागू नये म्हणून कृषी अधिकारी दर आठवड्याला एक दौरा करतात. या झाडाची संपूर्ण देखभाल जिल्हाधिकारी करतात. या झाडाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांसाठी एक पक्का रस्ताही शासनाने बनवला आहे.

आता वाचकांना प्रश्न पडला असेल की एका झाडाची एवढी काळजी का घेतली जाते? एका झाडाला एवढी व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट कशासाठी? तर हे झाड श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांनी लावले होते. हे झाड साधेसुधे नसून गौतम बुध्दांना ज्या झाडाखाली मोक्ष प्राप्त झाली होते, त्या झाडाची फांदी रोवण्यात आली होती.

या फांदीचे रुपांतर आता वृक्षामध्ये होऊ लागले आहे. हे झाड म्हणजे गौतम बुद्धाच्या अस्तित्वाचे प्रतीक मानले जात असल्याने या झाडाची इतकी काळजी घेतली जाते. झाडाला कीड लागल्यानंतर माणसासारखी काळजी घेतली गेली फेब्रुवारी महिन्यात हे झाड आजारी पडलं होतं, म्हणजेच त्याच्यावर रोग पडला होता.

वातावरणातील बदल आणि किड्यांमुळे झाडाची पाने काळी पडायला लागली होती आणि त्यांना भोकेही पडायला लागली होती. झाड आजारी पडल्याने चिंतेचं वातावरण पसरलं होतं. तत्काळ तज्ज्ञांना बोलावण्यात आलं आणि झाडावर इलाज सुरू करण्यात आले. माणसाला ज्या पद्धतीने इंजेक्शन आणि सलाईन लावली जाते, त्याच पद्धतीने झाडाला इंजेक्शन देण्यात आली आणि सलाईनही लावण्यात आली.

हे झाड ८ वर्षांपूर्वी लावण्यात आलेलं आहे. राजपक्षे यांनी २१ सप्टेंबर २०१२ रोजी हे रोपटे लावले होते. भूतानचे तत्कालीन पंतप्रधान जिग्मी योजर थिंगले हे देखील यावेळी उपस्थित होते. हे छोटेसे रोपटे आता डेरेदार वृक्षात बदलायला सुरूवात झाली असून हे झाड आता २० फूट उंच झाले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *