Home / कलाकार / या अभिनेत्रींनी हिरो नाही तर खतरनाक विलन सोबत लग्न केले

या अभिनेत्रींनी हिरो नाही तर खतरनाक विलन सोबत लग्न केले

बॉलीवूडकच्या जगात नेहमी नवीन नवीन गोष्टी घडत असतात ज्यांचा आपण अंदाजही नाही लावू शकत. बॉलीवूडमधल्या बऱ्याच अभिनेत्र्यांनी बॉलीवूडमधल्याच अभिनेत्याबरोबर लग्न केले आहे. कोणी बिसनेस मॅन बरोबर लग्न करत आहे किंवा केलंय तर कोणी क्रिकेटर बरोबर. काही अभिनेत्रींनी चित्रपटांमध्ये व्हिलन बरोबर लग्न केले.

आपण आता अशाच काही अभिनेत्री बघूया ज्यांनी व्हिलनची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने साकारली आहे. ‘हम आपके है कौन’ या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या रेणुका शहाणेने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. रेणुकाने आशुतोष राणा बरोबर २००१ मध्ये लग्न केले. आशुतोष राणा यांनी ‘संघर्ष’, ‘दुश्मन’ आणि ‘बादल’ यासारख्या चित्रपटांमध्ये व्हिलनची भूमिका साकारली आहे.

९० च्या दशकातील अभिनेत्री पूजा बत्राने सुप्रसिद्ध अभिनेते नवाब शाह यांच्याबरोबर लग्न केले. ते दोघे खूप दिवस रिलेशनशिप मध्ये होते आणि नंतर लग्नही केले. नवाब शाहने ‘टाईगर जिंदा है’, ‘डॉन २’ आणि अनेक साऊथ मधल्या चित्रपटांमध्ये व्हिलनचे काम केले आहे. कोरिओग्राफर पोनी वर्माने सुप्रसिद्ध अभिनेता प्रकाश राजबरोबर लग्न केले.

प्रकाश राज यांनी ‘दबंग २’, ‘सिंघम’, ‘वांटेड’ यासारख्या चित्रपटांमध्ये व्हिलनची भूमिका केली आहे. या दोघांनी २०१० मध्ये लग्न केले. अभिनेत्री निवेदिता भट्टाचार्यने के के मेनन बरोबर लग्न केले ज्यांनी बॉलीवूडमध्ये बऱ्याच चित्रपटांमध्ये व्हिलनची भूमिका केली आहे. ‘राणी लक्ष्मीबाई’, ‘कसम तेरे प्यार की’.

यांसारख्या बऱ्याच सुपरहिट मालिकांमध्ये काम करणाऱ्या कृतिका सेंगरने व्हिलनची भूमिका करणाऱ्या निकीतन धीर बरोबर २०१४ मध्ये लग्न केले. निकीतन धीर हे निर्देशक पंकज धीर यांचे सुपुत्र आहेत. निकीतन ने ‘मिशन इस्ताम्बुल’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘दबंग 2’ आणि ‘रेडी’ यासारख्या चित्रपटांमध्ये व्हिलनचे काम केले आहे.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published.