आपल्या देशात अनेक जातीधर्माचे लोक राहतात आणि त्यामुळे इथे बऱ्याच परंपरा सुद्धा मानल्या जातात. अनेक सण साजरे केले जातात मग त्यातले काही घरगुती असतात तर काही सार्वजनिक असतात. गणेशोत्सव, दसरा, महान व्यक्तींच्या जयंती या बऱ्याच मोठ्या प्रमाणावर इथे साजऱ्या केल्या जातात. याचे जास्त प्रमाण महाराष्ट्रात आहे. मग अशावेळी मिरवणुकाही निघत असतात. त्यावेळी बरेच जण ढोलताश्यांच्या तालावर ठेका धरतात आणि अशा सणांचा आनंद लुटतात.
अशावेळी माणसांची बरीच मजा होते पण महिलांना अशाठिकाणी मनमोकळे पणाने नाचत येत नाही कारण बरेचजण त्यांना नको त्या ठिकाणी हात लावतात आणि मजा घेतात. महिलांना अशी सार्वजनिक ठिकाणं खूप असुरक्षित वाटतात. हा जो व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यामध्ये फक्त आपल्याला महिला डान्स करताना दिसत आहेत. त्यांना जसे पाहिजे तसं मनमोकळेपणाने त्या नाचत आहेत आणि आनंद घेत आहेत. यातल्या काहीजणीना चांगला डान्स येत आहे तर काहीजणी फक्त मजा म्हणून नाचत आहेत.
या महिलांना इथे कसलाही तणाव नाही त्यामुळे त्या सर्वजणी या प्रसिद्ध हलगी गाण्याचा आनंद घेत आहेत. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुमचेही याबद्दलचे मत नक्की कळवा. इथे आज तुमच्यासाठी तुमच्या बऱ्याच आठवणींना उजाळा देणारा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तुम्हाला आठवत असेल वर्षातून एकदा शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असायचा जिथे आपण बराच सराव करून स्टेजवर डान्स करायचो. तुम्ही शाळेत असताना आशा काही गोष्टींचा अनुभव नक्कीच घेतला असेल.
आपल्या देशात अजूनही सर्वचजण सुशिक्षित नाहीत. आदिवासी वर्ग हा आधी बराच मागासवर्गीय असा समजला जायचा पण आता आपल्या देशातील बऱ्याच भागांत खूप बदल होत आहेत. आदिवासी समाजातील मुलेच नाहीतर मुलीसुद्धा आज शाळेत जाताना दिसत आहेत. मुलीसुद्धा आज मुलांप्रमाणे शिक्षण घेण्यासाठी पुढे येत आहेत. या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहाल तर या मुली ग्रुप डान्स करताना दिसत आहेत. यांना कदाचित शाळेमध्ये डान्स सरावासाठी जागा नसल्यामुळे ते समुद्र किनारी सराव करत आहेत.
जिथे आवड असते तिथे आपण बरोबर मार्ग काढतो हे इथे बरोबर शोभते. या मुलिंना शाळेच्या ड्रेसमध्ये आणि दोन वेन्यांमध्ये बघताना पुन्हा एकदा शाळेत जावे असे वाटते. या मुलींबरोबर त्यांचे शिक्षक सुद्धा आपल्याला दिसत आहेत. त्यांचा डान्स चांगला व्हावा यासाठी ते त्यांच्यापरीने प्रयत्न करत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला का? आमच्याबरोबर त्या आठवणी शेअर करायला विसरू नका.
बघा व्हिडीओ:
https://www.youtube.com/watch?v=8ba2LAXlAoI&embeds_euri=https%3A%2F%2Fnews66daily.com%2F&feature=emb_logo