Breaking News
Home / कलाकार / माझा होशील ना मधल्या सई ची बहीण आहे मोठी हिरोईन

माझा होशील ना मधल्या सई ची बहीण आहे मोठी हिरोईन

झी मराठीवर बऱ्याच नवीन मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत असतात. त्यातलीच एक म्हणजे ‘माझा होशील ना’ ही मालिका आहे. या मालिकेचे टायटल सॉंग तुम्ही ऐकले असेलच. हे गाणे टिकटॉक वर खूपच प्रसिद्ध झाले होते. मुख्य म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सुद्धा या गाण्याचा टिकटॉक वर व्हिडीओ बनवून टाकला होता.

एका मराठी मालिकेच्या गाण्याचा हिंदी अभिनेत्रीने व्हिडीओ बनवून टाकणे आश्चर्यकारक आहे. याच मालिकेत काम करणाऱ्या सईबद्दल आपण बोलणार आहोत. या मालिकेत सई म्हणजेच गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी हे दोघे प्रमुख भूमिकेत आहेत. या दोघांची एक मुलाखत झाली होती त्यात या दोघांनी एकमेकांच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या.

गौतमी ही लहानपणापासूनच खूप चुलबुली स्वभावाची आहे आणि कधीही शांत नाही बसणार. तसेच गौतमी आणि विराजस हे साधारण अकरावीपासून एकत्र आहेत. त्यांनी शिक्षण एकत्र घेतले, नाटकात एकत्र काम केले आणि या मालिकेतही एकत्र काम करत आहेत. ते दोघेही पुण्यातलेच आणि दोघांची घरे जवळजवळ आहेत.

ते एकमेकांना खूप चांगले ओळखतात. तर एका झालेल्या मुलाखतीत गौतमीचे अकरा वर्षे झाले नखरे झेलतोय असे विराजसने सांगितले. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, गौतमी ही मृण्मयी देशपांडेची लहान बहीण आहे. त्या दोघींची आईदेखील गायक आहे. गौतमीची ‘सारे तुझ्याचसाठी’ ही पहिली मालिका होती. यामध्ये तिने हर्षद अतकरीबरोबर काम केले आहे.

तिने इंजिनिअरिंगची पदवी घेतली असून काही दिवस नोकरीही केली आहे. परंतु अभिनयाची आवड असल्याने तिने टेलिव्हिजन क्षेत्रात जायचे ठरवले. ‘मन फकिरा’ या चित्रपटासाठी तिने गाणे सुद्धा गायले आहे. अभिनयाबरोबरच तिला गायन, कविता आणि बरेच काही येते. तिच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *