१) स्पृहा जोशी : जन्म : १३ ऑक्टोबर १९८९ (२७वर्ष), मुंबई चित्रपट : मोरया (२०११), ए पेईंग घोस्ट(२०१५), जरा हटके(२०१६), लॉस्ट अँड फाउंड(२०१६) स्पृहा जोशी हि एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री तर आहेच शिवाय एक चांगली poet आहे. अनेक नाटकांतही काम केले आहे. २) सिद्धार्थ जाधव : जन्म : २३ ऑक्टोबर १९८१ (वय ३५) चित्रपट : टाइम्प्लिज, जत्रा, लालबाग परळ, इरादा पक्का, फक्त लढ म्हणा, पारध, क्षणभर विश्रांती, दे धक्का, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हुप्पा हुय्या, खो खो. सिद्धार्थने पहिल्यांदा देवेंद्र पेम यांच्या ‘तुमचा मुलगा करतो काय’ या नाटकामधून त्यांची सुरुवात केली. या आपल्या लाडक्या सिद्याने कॉमेडीच नव्हे तर व्हिलन, रोमँटिक हिरो अशा बऱ्याच भूमिका केल्या आहेत. त्याचप्रमाणे हिंदीतल्या लोकप्रिय सीरिअल्स आणि रिऍलिटी शो मध्ये हि सिद्धार्थ जाधव लोकप्रिय आहे. त्यांनी नाटकांमध्येही काम केले.
३) प्रिया बापट : जन्म : १८ सप्टेंबर १९८६ (वय ३१), मुंबई चित्रपट : मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, टाइम्प्लिझ, वजनदार, काकस्पर्श, टाईमपास २, हॅप्पी जर्नी, आंधळी कोशिंबीर. मुन्ना भाई एम बी बी एस सारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटात प्रियाने काम केले आहे. काकस्पर्श या चित्रपटासाठी प्रियाला स्क्रीन अवॉर्ड (२०१३) चा best actress हा पुरस्कार मिळाला. प्रियाचा अभिनय हा तेवढाच सुंदर असतो जेवढं ती सुंदर दिसते.
४) सई ताम्हणकर : जन्म : २५ जून १९८६ (वय : ३१), सांगली चित्रपट : दुनियादारी, वजनदार, क्लासमेट्स, प्यार वाली लव्ह स्टोरी, टाइम प्लिज, बालक पालक, सनई चौघडे, झकास, गजिनी, हंटर यांसारख्या लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांमध्ये सुद्धा तिने काम केले आहे. अनेक सिरीअल्स मध्येही काम केले आहे. मराठी मधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून सई कडे पहिले जाते.
५) सिद्धार्थ चांदेकर : जन्म : १४ जुन १९९१(२६ वर्ष), पुणे चित्रपट : झेंडा, क्लासमेट्स, दुसरी गोष्ट, बालगंधर्व, जय जय महाराष्ट्र. सिद्धार्थने बऱ्याच चित्रपटांमध्ये आणि सीरिअल्स मध्ये काम केले आहे. ‘ हमने जिना शीख लिया ‘ या हिंदी चित्रपटातून याने त्याच्या करिअरला सुरुवात केली. दुनियादारी या चित्रपटामुळे हा खूप लोकप्रिय झाला आहे. सिद्धार्थ चे अनेक मराठी चित्रपट आता आले असून त्याची एक नवीनच ओळख निर्माण झाली आहे. लाखो लोकांचा चाहता सिद्धार्थ चांदेकर आहे. पोस्ट आवडली असेल तर बॅक जाऊन शेअर नक्की करा.