प्रत्येकाला आठवणी असतात आणि एकदा त्या आठवणींना उजाळा मिळाला की त्यासंबंधित अनेक आठवणी आपल्याला आठवू लागतात. शाळेत असताना म्हणजेच आपण लहान असताना बऱ्याच नवीन नवीन गोष्टी कराव्यात असे प्रत्येकाला वाटत असते. नेहमी आपण वेगळे काय करू शकतो हे बघतो. तुम्हालाही शाळेमध्ये साजरा होणारा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आठवत असेल ज्यावेळी अनेकजण स्टेजवर जाऊन डान्स करण्यासाठी उत्सुक असतो.
काही जणांचे तर काही करायला जरी येत नसेल तरी चालेल परंतु स्टेजवर जायचे असे असते. असाच तुमच्या आठवणींना उजाळा देणारा व्हिडिओ घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ सुध्दा एका वार्षिक स्नेहसंमेलनाचा आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मालेवडी अकलूज येथील हा व्हिडिओ आहे. अनेक लहान मुलं मुली इथे तुम्हाला नाचताना दिसतील.
अलीकडे लग्नांमध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी डान्स केलेला पाहिलं असेल. काही लग्नामध्ये ज्यांचे लग्न आहे तेच नवरा नवरी नाचतात तर काही ठिकाणी त्यांचे मित्रमैत्रिणी नाचत असतात तर कुठे बाहेरून नाचण्यासाठी बोलवले जाते. तुमच्यासाठी इथेही असाच एका लग्नातील डान्स घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही डान्स करावा असे वाटेल. या व्हिडिओ मध्ये काही मुली तुम्हाला नाचताना दिसतील.
इथे सुप्रसिध्द गाणे ‘तू चीज बडी हैं मस्त मस्त‘ यावर डान्स केला जात आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल की, या सर्व मुलींनी सारखे कपडे घातले आहेत जेणेकरून डान्स बघणाऱ्याला सुध्दा चांगले वाटेल. या मुली खूप छान नाचत आहेत. एका लग्नकार्यात हा डान्स केला आहे. आजूबाजूला ही तुम्ही पाहिले तर अनेकजण डान्ससाठी उभा राहिले आहेत. असे डान्स असतील तर बघणाऱ्यालाही अजून बघावेसे वाटते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा.
आजवर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील परंतु इथे एक सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. यामध्ये तुम्ही जर पाहिले तर ‘तू ही रे‘ या मराठी चित्रपटातील गुलाबाची कळी यावर डान्स केला आहे. इतर व्हिडिओपेक्षा वेगळे काहीतरी या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता. यामध्ये व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंग खूप छान केले आहे आणि त्याप्रमाणेच डान्स सुध्दा सुंदर आहे. मराठी गाण्यावर बॉलिवूड डान्स केला आहे. हा डान्स शिवानी नाईक, नमिता मोहिते आणि असावरी जोशी यांनी केला आहे. चेहऱ्यावर ही साजेसे असे भाव देऊन खूप छान असा डान्स या तिघींनी केला आहे. तुम्हालाही या तिघींपैकी कोणाचा डान्स जास्त आवडला, आम्हाला नक्की सांगा.
बघा व्हिडीओ: