आपण मराठी असल्याचा अभिमान वाटेल असे काहीतरी आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. आपल्या देशातील बरेचजण विदेशी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असतात आणि तसे बोलतात सुद्धा आणि ते पाहून आपल्याला बरे वाटते. परंतु ज्यावेळी कोणी विदेशी व्यक्ती आपली मातृभाषा शिकतो आणि आपल्याबरोबर आपल्या भाषेत बोलतो तेव्हा ती खूप अभिमानाची गोष्ट असते. नाही का?
हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहाल तर तुम्हालाही या व्हिडिओतील दोन मुलींचे कौतुक वाटेल. एक मुलगी आहे ती ब्राझील वरून आलेली आहे तर एक फ्रांसची आहे. या दोघींची मराठी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. लेटीशिया मडोस हे ब्राझीलची तर फ्रांसच्या मुलीचे नाव मेलीन लाग्रत आहे. सध्या या औरंगाबाद मध्ये आहेत.
दोघींनाही बऱ्यापैकी मराठी भाषा समजते पण बोलताना त्या मराठी माणसाएवढ्या कुशल बोलत नाहीत. परंतु त्यांना मराठी बोलताना पाहिले तर तुम्हालाही त्यांची मराठी ऐकत बसू वाटेल. व्हिडिओमध्ये पाहिले तर तुम्हाला समजेल की ज्या मराठी कुटुंबात त्या राहत आहेत तिथून त्या मराठी संस्कृतीबद्दल बरंच काही शिकत आहेत.
देवाची पूजा करणे, रांगोळी काढणे, चहा करणे, जेवण बनवणे हे सुद्धा त्या करतात. सुखकर्ता दुखहर्ता ही गणपती आरती सुद्धा ती रोज म्हणते असे ती सांगते. या परदेशी मुलींनी वरकड यांच्या घरी राहून बऱ्याच महाराष्ट्रातील गोष्टी पाहिल्या आणि शिकल्या आहेत. तुमचाही अश्या मराठी भाषा येणाऱ्या परदेशी व्यक्तींबरोबर कधी संबंध आला आहे का? आम्हाला कळवायला विसरू नका.
पहा व्हिडीओ: