बैलपोळ्याच्या दुसऱ्याच दिवशी बैलांवर आली अशी वेळ

शेतकऱ्याचा आवडता सण म्हणजे बैल पोळा. या दिवशी बळीराजा आपल्या खास मित्राचा म्हणजे आपली आवडत्या बैलाचा सावतोपरी सन्मान करून त्याच एक प्रकारे आभार मानण्याचा उत्सव साजरा करत असतो. परंतु याच सणाच्या दिवशी बळीराजावर दुः खाचा डोंगर कोसळण्याची घटना नेवासा तालुक्यातील खालालपिंप्री येथे घडली.

बैलपोळ्याच्या सणाच्या दुसर्‍याच दिवशी रस्त्यामध्ये पडलेल्या विजेच्या तारांचा शॉ क लागल्याने बैलजोडीचा मृ त्यू झाला. बाबासाहेब जर्‍हाड (वय ३८, रा. बकुपिंपळगाव ता. नेवासा असे या दुखी बळीराजाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, शेतकरी बाबासाहेब जर्‍हाड हे पत्नी अशाबाई जर्‍हाड, मुलगा अण्णासाहेब जर्‍हाड, मुलगी कविता यांसह आपल्या शेतात चारा आणण्यासाठी बैलगाडीतून जात होते.

शेजारील खलाल पिंप्री गावच्या शिवारातून जात असताना रस्त्यावर विजेच्या तारा तुटून खाली पडल्या होत्या. परंतु गवतामुळे त्या दिसून आल्या नाहीत. कच्चा रस्ता व जमीन ओली असल्याने विजेच्या तारांना स्पर्श होताच सर्जा व राजा नाव असलेल्या बैलजोडीचा जागीच मृ त्यू झाला. ट्रान्स फार्मर परिसरातील तारांमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहाने ही घटना घडली.

दरम्यान, लोखंडी बैलगाडीत बसलेल्या ४ जणांनी तातडीने उड्या मारल्याने त्यांचे प्रा ण वाचले. महावितरणसह अन्य संबंधितांनी घटनास्थळी येऊन घटनास्थळाचा पंचनामाही केला. जर्‍हाड याची गरिबी आणि दयनीय अवस्था पाहून प्रशासनाने त्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

जर्‍हाड यांनी कर्ज घेऊन खिलारी जातीचे दोन बैल एक लाख दहा हजार रुपयांना विकत घेतले. या बैलांच्या मदतीने ते दररोज कोणत्या ना कोणत्या शेतकर्‍याकडे जाऊन त्यांच्या शेतात पेरणी व सर्व प्रकारच्या मशागतीची कामे मोठ्या कष्टाने करायचे. परंतु आता मोठे नुकसान या कुटुंबाचे झाले आहे. त्यामुळे या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *