Breaking News
Home / कलाकार / बिग बॉसच्या मास्टरमाईंड ची १ नंबरची शत्रू आहे हि

बिग बॉसच्या मास्टरमाईंड ची १ नंबरची शत्रू आहे हि

‘बिग बॉस’ हा एक असा कार्यक्रम आहे ज्यामुळे बऱ्याच व्यक्तींना किंवा कलाकारांना ओळख मिळाली आहे. तिथे गेल्यावर व्यक्तीला त्याच्या माणसांची आणि बाहेरच्या माणसांची किंमत कळते. व्यक्तीचा खरा स्वभाव या कार्यक्रमापासून कधी लपला नाही. याच कार्यक्रमातील एका व्यक्तीबद्दल आज आपण इथे माहिती घेणार आहोत. या शोमुळे त्या व्यक्तीचे नाव ‘मास्टरमाईंड’ हे ठेवले गेले.

आपण येथे विकास गुप्ता बद्दल माहिती घेणार आहोत. जर तुम्ही हा शो बघत असाल तर सध्या झालेल्या वादामुळे विकास गुप्ता आणि आर्शी खान हे दोघेही खूप चर्चेत आहेत याची कल्पना तुम्हाला असेलच. विकास हा शोमधून बाहेर आला आहे. विकास हा प्रोड्युसर, स्क्रीनरायटर, टीव्ही होस्ट करतो. ‘बिग बॉस ११, बिग बॉस १३, बिग बॉस १४,खतरो के खिलाडी’ या शोमध्ये त्याने सहभाग घेतला आहे, तसेच ‘एस ऑफ स्पेस’ या शोला सुद्धा त्याने होस्ट केले आहे.

विकासचा जन्म ७ मे १९८७ ला डेहराडून उत्तराखंडमध्ये झाला. सध्या तो मुंबईत स्थायिक आहे. विकासच्या आईचे नाव शारदा गुप्ता तर बहिणीचे कोमल गुप्ता आहे. विकासला दोन भाऊ सुद्धा आहेत. ‘मुझे मेरी फॅमिली से बचाओ, गुमराह, गोल्डन एरा विथ अनु कपूर’ यांसारख्या कार्यक्रमांची स्क्रिप्ट पण लिहिली आहे.

त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाउस आहे ज्याचे नाव ‘द लॉस्ट बॉयस’ असे आहे. ‘बिग बॉस ११’ मध्ये विकासचे शिल्पा शिंदे बरोबर वाकडे होते तर आता ‘बिग बॉस १४’ मध्ये आर्शी खान शत्रू झाली. विकासच्या आयुष्यात बरेच कठीण प्रसंग आले आहेत ज्याला त्याने धीराने आणि हिम्मतीने सामना केला आहे. तुम्हालाही विकास गुप्ता कसा वाटतो कमेन्टमध्ये नक्की सांगा.

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *