आपल्या देशात अनेक जातीधर्माचे लोक राहतात आणि त्यामुळे इथे बऱ्याच परंपरा सुद्धा मानल्या जातात. अनेक सण साजरे केले जातात मग त्यातले काही घरगुती असतात तर काही सार्वजनिक असतात. गणेशोत्सव, दसरा, महान व्यक्तींच्या जयंती या बऱ्याच मोठ्या प्रमाणावर इथे साजऱ्या केल्या जातात. याचे जास्त प्रमाण महाराष्ट्रात आहे.
मग अशावेळी मिरवणुकाही निघत असतात. त्यावेळी बरेच जण ढोलताश्यांच्या तालावर ठेका धरतात आणि अशा सणांचा आनंद लुटतात. अशावेळी माणसांची बरीच मजा होते पण महिलांना अशाठिकाणी मनमोकळे पणाने नाचत येत नाही कारण बरेचजण त्यांना नको त्या ठिकाणी हात लावतात आणि मजा घेतात.
महिलांना अशी सार्वजनिक ठिकाणं खूप असुरक्षित वाटतात. हा जो व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यामध्ये फक्त आपल्याला महिला डान्स करताना दिसत आहेत. त्यांना जसे पाहिजे तसं मनमोकळेपणाने त्या नाचत आहेत आणि आनंद घेत आहेत. यातल्या काहीजणीना चांगला डान्स येत आहे तर काहीजणी फक्त मजा म्हणून नाचत आहेत.
या महिलांना इथे कसलाही तणाव नाही त्यामुळे त्या सर्वजणी या प्रसिद्ध हलगी गाण्याचा आनंद घेत आहेत. गाणे लागल्यावर अनेकांना नाचावेसे वाटत असतेच. संगीत हे माणसांना नाचायला भाग पाडते असे देखील आपण म्हणू शकतो तुम्हाला देखील याचा अनुभव आला असेलच. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुमचेही याबद्दलचे मत नक्की कळवा.
पहा व्हिडीओ: