Breaking News
Home / कलाकार / बबड्याची आई आहे करोडपती मालिका सोडून करते हे उद्योग

बबड्याची आई आहे करोडपती मालिका सोडून करते हे उद्योग

प्रेम हे दोन जीवांना एकत्र आणत. ज्यावेळी मुलं मुली प्रेमात पडतात तेव्हा त्यांना बाकीचे काही दिसत नाही. फक्त एकमेकांच्या नेहमी बरोबर असावं असं वाटत असते. आपण आपल्या रोजच्या जीवनात बऱ्याच प्रेमकहाण्या आजूबाजूला ऐकतो-बघतो. पण या अभिनेत्या किंवा अभिनेत्रींचे प्रेम कसे असेल बरे? यांच्या प्रेमात काही खास गोष्टी असतात का?

सेलेब्रिटी लोक प्रेम झाल्यावर काय काय करतात? जास्तकरून आपण सोशल मीडियावर हिंदी सिनेसृष्टीतील प्रेमकहाण्या पाहतो. चला तर मग आज माहिती करून घेऊया एक मराठी अभिनेता अभिनेत्रीची प्रेमकहाणी. कसे त्यांच्यामध्ये प्रेम जुळत गेले याचीही माहिती. आजची ही प्रेमकहाणी आहे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या दोघांची.

मराठी चित्रपट प्रेमींना अशोक सराफ तर नक्कीच माहीत असणार. अशोक सराफ हे खूप प्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत. अशोक सराफ हे मूळचे बेळगावचे. अशोक यांचा जन्म ४ जून १९४७ ला मुंबई येथे झाला तर निवेदिताचा जन्म ६ जून१९६५ ला झाला. प्रेम करताना प्रेम हे काय वय जात पाहून होत नाही. समोरचा व्यक्ती, त्याचा स्वभाव आवडला की तिथे प्रेम होतं.

या दोघांच्याही वयात १८ वर्षे म्हणजेच खूप फरक आहे पण जर समोरची व्यक्ती आवडलीच आहे, प्रेम झाले आहे तर तिथे वयाचा प्रश्न नाही उद्भवत. दोघेही एकमेकांना पसंत करत होते त्यामुळे त्यांचे लग्नही झाले. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची ‘डार्लिंग डार्लिंग’ या नाटकाच्या वेळी पहिली भेट झाली होती. निवेदिताच्या वडिलांनी अशोक यांना एक छोट्या मुलीची ओळख करून देताना ही माझी मुलगी अशी निवेदिताची ओळख करून दिली होती.

त्यावेळी अशोक यांचं करिअर नुकतंच चालू झालेले. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे दोघेही ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटात काम करत होते. पण ते एकमेकांशी एवढे बोलत नव्हते. त्याच चित्रपटापासून खरंतर त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. त्यानंतर ‘तू सौभाग्यवती हो’ हा चित्रपटही केला. ‘धुमधडका’ या चित्रपटापासून त्यांच्या खऱ्या प्रेमाला सुरुवात झाली.

पण प्रत्येक प्रेमकहाणीमध्ये काहीतरी अडचण असतेच. इथे निवेदिता यांच्या आईला वाटत होते की निवेदिताने अभिनय क्षेत्रातील मुलाबरोबर लग्न करू नये. त्या तिच्या विरोधात होत्या. परंतु निवेदिताही स्वतःच्या मताशी ठाम होत्या. त्यांनीही त्यांच्या आईचा विरोध केला. निवेदीताचे मत असे होते की, लग्न करेल तर अशोक सराफ यांच्याशीच करेल. नंतर घरात लग्नाची बोलणी चालू झाली.

पण अशोक सराफ यांच्या घरची परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नव्हती. अशोक यांच्या घरी त्यांचा मोठा भाऊ सगळा घरचा कारभार सांभाळत होते. घरी अशोक यांनी त्यांचा भाऊ आणि वहिनी यांना निवेदिता बद्दल सांगितले तेही या लग्नाला तयार झाले होते. दोघांच्या लग्नसोहळ्याचा कार्यक्रम गोवा मध्ये एका मंदिरात सर्व कुटुंबातील व्यक्तीसमवेत पार पडला.

लग्नानंतरही त्यांनी चित्रपटासाठी खूप कष्ट केले आणि सुपरस्टार बनले. त्यांच्या या कष्टाची घोडदौड अशीच चालू राहिली आणि त्यामुळेच आपल्या सगळ्यांना आज ते ओळखीचे आहेत. लग्नानंतर निवेदिता यांनी घराकडे लक्ष दयायचे ठरवले. आपल्याला त्या जवळपास १४ वर्ष आता चित्रपट किंवा नाटकात काम करताना नाही दिसत. त्यांच्या या लग्नाला तब्बल ३३ वर्षे पूर्ण झाली.

सिनेसृष्टीत एवढे वर्षे एखाद्या जोडीने एकत्र राहणे म्हणजे नवलच आहे. या दोघांचे हे प्रेम आणि एवढ्या वर्षांची साथ हे दुसऱ्यांसाठी खूप चांगले उदाहरण बनले आहे. या दोघांनाही एक मुलगा आहे जो शेफ म्हणून काम करतो. हे कुटुंब सुखात आपले जीवन व्यतीत करत आहे. अशी ही जोडी कोणालाही आवडेल.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *