सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आजकाल पोस्ट होत असतात. ज्यावेळी आपण एक विरंगुळा म्हणून मोबाईल घेऊन बसतो तेव्हा सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहताना आपला टाईम कसा निघून गेला हे समजत ही नाही. डान्स करायचा असेल तर तो डान्स तेव्हाच चांगला वाटतो जेव्हा डान्स करणारा त्याचे डान्स स्टेप्स हावभाव करून नीट करतो.
तुम्ही बहुतांश करून हाडकुळ्या व्यक्तींनाच डान्स करताना पाहिले असेल. बऱ्याच जणांचा समज असतो की जाड माणसांना किंवा महिलांना डान्स करायला नाही येत. यामागे मग बरीच कारणे असू शकतात जसे की जाड व्यक्तींना डान्स करताना अंग हलत नाही, दम जास्त भरतो. परंतु आजचा हा व्हिडिओ पाहून तुमचे हे मत बदलेल. जोगवा चित्रपटातील ‘लल्लाटी भंडार‘ या गाण्यावर हा व्हिडिओ आहे.
यामध्ये तुम्हाला विशाखा सुभेदार आणि लतिका श्रियान या दोघी डान्स करताना दिसतील. हिरवी साडी तसेच त्यावर कवड्याचे दागिने आणि कपाळावर भंडारा हा त्यांचा लूक खूप सुंदर दिसत आहे. याबरोबरच सुंदर असा त्यांचा हा डान्स आहे. जाड असूनही एवढ्या चांगल्या पद्धतीने हा डान्स त्यांनी केला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.
शाळा म्हणलं कि आपल्या बऱ्याच आठवणी जाग्या होतात, हो ना ? प्रत्येकाच्या या बाबतीमधील आठवणी या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असू शकतात मग ती कोणाला शाळेतील शिक्षकांची तर कोणाला एका खास मैत्रिणीची किंवा मित्राची असू शकते. शाळेत असताना अनेक स्पर्धा सुद्धा घेतल्या जायच्या आणि उत्सुक विद्यार्थी त्यामध्ये सहभागी व्हायचे आणि स्वतः दुसऱ्यांपेक्षा वेगळं काय करू शकतो याचा विचार करत असतात. तुम्ही आम्ही जवळपास सर्वांनी शाळेत असताना वार्षिक स्नेहसंमेलनात सहभाग तर घेतलाच असेल.
त्यावेळी शाळेत अनेक कार्यक्रम साजरे केले जातात. असाच एक वार्षिक स्नेहसंमेलनाचा विडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. हा विडिओ एका ग्रुप डान्सचा आहे ज्यामध्ये सुंदर मुली नाचत आहेत. या मुलींनी पोशाख हा साधाच केला आहे पण त्यांचा डान्स खूप सुंदर आहे. या विडिओत अनेक गाणी समाविष्ट केली आहेत ज्यामुळे डान्सला अजून शोभा आली आहे.
मुली खूप जोशात आणि मनमोकळे पणाने नाचत आहेत. त्यावेळेचा खूप आनंद घेत आहेत. असे स्टेजवर जाऊन सर्वांसमोर नाचणे आपल्याला जरी सोप्पे वाटत असले तरी ते प्रत्यक्षात खूप अवघड असते. व्हिडिओत जर तुम्ही पाहिले तर मधली मुलगी खूप छान डान्स करत आहे. सर्वांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा खूप चांगले आहेत. तुम्हालाही हा डान्स कसा वाटला किंवा तुमच्या शाळेतील काही आठवणी आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
बघा व्हिडीओ: