Breaking News
Home / कलाकार / फुलाला सुगंध मातीचा मधल्या शुभम ला पाहून पागल व्हाल

फुलाला सुगंध मातीचा मधल्या शुभम ला पाहून पागल व्हाल

‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका आता खूप लोकप्रिय होत आहे. या मालिकेत जिजीअक्का, शुभम आणि कीर्ती हे प्रमुख भूमिका असलेले पात्र आहेत. शुभम हा जिजीअक्काचा आवडता आणि मेहनती मुलगा आहे. शुभमचा स्वभाव हा अतिशय शांत आणि समंजस असा आहे. तो फक्त सातवी पास आहे आणि स्वतःचे मिठाईचे दुकान तो चालवतो.

याच शुभमच्या खऱ्या आयुष्याची माहिती आज तुम्हाला इथे समजेल. शुभमचे खरे नाव हर्षद अतकरी आहे. त्याचा जन्म १७ ऑक्टोबर १९८७ ला मुंबई मध्ये झाला आहे. त्याने सध्या त्याच्या वयाचे ३३ वर्षे पूर्ण केले आहे. हर्षद हा अभिनयाबरोबरच मॉडेलिंगसुद्धा करतो. त्याबरोबरच त्याला वाचनाची आवड आहे. शालेय शिक्षण घेत असताना त्याने बऱ्याच नाटकात आणि स्नेहसंमेलनात भाग घेतला आहे.

त्याने एमबीएची पदवी मिळवली आहे. नंतर त्याने अभिनय क्षेत्रात जायचे ठरवले. त्याने या टीव्ही क्षेत्रातीळ कामाची सुरुवात २०१३ मध्ये आलेल्या ‘दुर्वा’ या मालिकेपासून केले. यात त्याने केशवची भूमिका अतिशय उत्तमरित्या साकारली होती. त्या मालिकेचे ११६४ एपिसोड झाले. केशव हा त्यावेळी घराघरात पोहचला होता.

हर्षदच्या घरी कोणीही अभिनय क्षेत्रात काम करत नाही तरीही त्याने अतिशय जिद्दीने आणि मन लावून अभिनयाचे काम केले आणि तो आता एक यशस्वी अभिनेता बनला आहे. ‘दुर्वा’ नंतर तो झी युवावरील ‘अंजली’ या मालिकेत दिसून आला. त्याने त्यात डॉक्टरची भूमिका अतिशय उत्तमरीत्या साकारली होती.

यानंतर तो सोनी मराठीवरील ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेमध्ये दिसून आला. यामध्ये त्याने गौतमी देशपांडे बरोबर काम केले आहे. सध्या तो ‘फुलाला सुगंध मातीचा’ मध्ये शुभमची भूमिका साकारत आहे. शुभम हा दिसायला जरी शांत सोज्वळ असला तरी तो खूप हँडसम आहे. तुम्हालाही या हँडसम शुभमचा म्हणजेच हर्षदचा अभिनय कसा वाटतो कंमेन्ट मध्ये नक्की सांगा.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *